karnataka elections BJP Candidate List
karnataka elections BJP Candidate List Sarkarnama
देश

Karnataka Elections: माजी मुख्यमंत्र्याचे सातव्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगणार की बंडखोरी करणार ? ; नड्डांच्या भेटीसाठी..

सरकारनामा ब्युरो

BJP Candidate List Karnataka Elections 2024 : कर्नाटक विधासभेसाठी भाजपने आपली पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या १८९ उमेदवारांच्या यादीत अनेक बड्या नेत्यांचे तिकीट कापले आहे.

यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवाडी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. जगदीश शेट्टार यांना भाजपने 'निवडणूक लढू नका' असे सांगितले आहे. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आज (बुधवारी) त्यांना दिल्लीला बोलवलं आहे. शेट्टार हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दुसऱ्याला संधी देण्यासाठी भाजपने शेट्टार यांचे तिकीट कापले आहे. शेट्टार हे नड्डांना भेटण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहे. अजून ३४ नावांची यादी बाकी आहे.

विद्यमान आमदार महादेवप्पा यादवाद यांचेही तिकीट कापले आहे. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी विरोध प्रदर्शित केला. त्यांच्या जागी भाजपमध्ये नुकतेच आलेले चिक्का रेवना यांना तिकीट देण्यात आले आहे. कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेट्टार हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातून भाजपने आले आहे. उत्तर कर्नाटकमध्ये त्यांच्या प्रभाव आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पानंतर दुसरे मोठे नेते म्हणून शेट्टार यांची ओळख आहे. हुबळी-धारवाड या त्यांचा मतदारसंघ आहे. ते २०१२-२०१३ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.(Latest Maharashtra News)

विधानसभेचे विरोधीपक्षनेते, विधानसभेचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पण सातव्यांदा आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का, हे दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर समजेल.(Political Breaking News)

मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रसाद यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात भाजपने ५२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. ८ महिला उमेदवार आहेत. नऊ डाँक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात आहे.

माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पाचे सुपुत्र बीवाई विजयेंद्र यांना शिकारीपुर विधानसभेतून रिंगणात उतरणार आहेत. येदियुरप्पांचा या मतदारसंघ आहे. तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शिगगांव येथून निवडणूक लढणार आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT