CM Basavraj bommai| HIjab case
CM Basavraj bommai| HIjab case Twitter/@ANI
देश

हिजाबचा निकाल देणाऱ्या मुख्य न्यायाधीशांना धमकीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

बंगळूर: कर्नाटक सरकारने हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या तीन न्यायमूर्तींना आम्ही Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी दिली आहे. हिजाब प्रकरणी ((Hijab case) निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कर्नाटक सरकारने तातडीने पावले उचलत न्यायमुर्तींना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकेच नव्हे तर, बसवराज बोम्मई यांनी विधानसौधा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश संबंधित डीजी आणि आयजींना दिले आहेत. हिजाबचा निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचा न्यायाधिशांना निकालानंतर काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 15 मार्च रोजी उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील गणवेशाबाबतचा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला होता.

त्यानंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, वकील उमापती यांनी शनिवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे तक्रार केली होती. उमापती यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ पाठण्यात आला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना उघडपणे धमकावताना दिसत आहे. यादरम्यान व्हिडीओमधील व्यक्ती झारखंडच्या न्यायाधीशांच्या कथित हत्येचाही संदर्भ दिला आहे. कर्नाटकच्या सरन्यायाधीशांनाही अशाच प्रकारे धमकावण्यात आल्याचे उमापती यांनी आफल्या तक्रारीत म्हटले आहे.

या व्यक्तीने न्यायाधीशांच्या कुटुंबीयांसह उड्डपी मठाच्या भेटीचाही उल्लेख केला आहे. याशिवाय त्याने हिजाबच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयाबाबत चुकीची भाषा वापरली आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेत विधानसौधा पोलिसांनी संबंधिक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून राज्य सरकारने न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोवई रहमतुल्ला नावाच्या व्यक्तीला तिरुनलवेली येथून ताब्यात घेण्यात आले आहे, तर जमाल मोहम्मद उस्मानी नावाच्या व्यक्तीला तंजावरमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि काझी एम झैबुन्निसा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिजाब प्रकरणी हा निकाल दिला. यावेळी उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर घातलेली बंदी योग्य ठरवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT