मग मोहन भागवतांच्या नावापुढे 'खान' लावणार का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

CM Uddhav Thackeray| Mohan Bhagwat| आरएसएस मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरु करणार अशी बातमी चार दिवसांपूर्वीच वाचली.
Mohan Bhagwat-CM Uddhav Thackeray
Mohan Bhagwat-CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : “एमआयएमच्या (AIMIM) युतीच्या प्रस्ताव आल्यापासून भाजप शिवसेनेला (Shivsena) जनाबसेना म्हणत आहे. पण शिवसेनेने आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आता भाजपचा डाव पहा, काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली. हाच खरा भाजपचा (BJP) प्लॅन आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, भ्रष्टाचार हे मुद्दे प्रकर्षाने मांडले जात आहेत. या टीकेला शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mohan Bhagwat-CM Uddhav Thackeray
प्रस्ताव नाकरल्यावरही इम्तियाज जलील जोर लावणार, ठाकरे-पवारांची भेट घेणार..

“अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी युती केली, तितका निर्लज्जपणा शिवसेना करणार नाही. सत्तेसाठी भाजपने मुफ्तींसोबत युती केलेली चालते मग आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली तर मोठं आभाळ कोसळलं का,म्हणजे आम्ही एखादी गोष्ट केली तर ती वाईट आणि तुम्ही काही केलं तर तो आदर्श म्हणून. मेबबुबा मुफ्तींनी जे काही तारे तोडले ते करुनही भाजपने त्यांच्यांशी युती केली, तरी ते देशप्रेमी आणि आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादीशी युती केली तर ती देशद्रोही का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“भाजप शिवसेनेला मुस्लीमधार्जिणी म्हणते, मग आता मीही सरसंघचालक मोहन भागवत यांची वाक्ये घेऊन बसलो आहेत. आरएसएस मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरु करणार अशी बातमी चार दिवसांपूर्वीच वाचली. जर मला जनाब म्हणणार असाल तर, मग हे कोण आहेत, या मुसलमानांचं काय करायचं, मग आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं की मुसलमान संघ म्हणायचं की राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, तुमच्या सरसंघचालक मोहन भागवतांच्या नावापुढे खान लावणार का, असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे.

Mohan Bhagwat-CM Uddhav Thackeray
'त्यावेळी' एकही मायेचा पूत काश्मिरी पंडितांसोबत नव्हता- ठाकरेंचा पलटवार

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देतील का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे. आता एक दिवस हेच स्वतलाच हिंदुत्वाचे बाप म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील, म्हणजेच आपला तो बाब्या आणि इतरांचे ते गुंड. अनेकवेळा यांचे जवाब घेतले तर नुसता थयथयाट करतात, लोकशाहीचा अपमान म्हणतात, हाच फरक आपल्यात आणि भाजपमध्ये आहे, की आपण खोटे बोलू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com