कर्नाटक सरकारने 10,419 अतिथी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.
महाविद्यालयांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
karnataka news : कर्नाटक राज्यातील सिद्धरामय्या सरकारने सरकारी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची कमतरता दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च शिक्षण खात्याने तीन वर्षांच्या कालावधीसाठी १०, ४१९ अतिथी प्राध्यापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याची माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी या दिली आहे.
सरकारने ११,१०० अतिथी प्राध्यापक नियुक्त करण्याची परवानगी दिली आहे. ऑनलाईन कौन्सिलिंगद्वारे १०,४१९ उमेदवारांची निवड केली आहे. या नेमणुका तात्पुरत्या कालावधीसाठी असून, त्या कायमस्वरूपी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, यूजीसीच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या ३,८५३ अतिथी प्राध्यापकांना ‘शिक्षण समन्वयक’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नव्याने नेमण्यात येणारी अतिथी प्राध्यापकपदे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जातील. त्यांच्यावर प्रयोगशाळेच्या कामात साहाय्य करणे आणि शैक्षणिक व गैर-शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याची जबाबदारी सोपवली जाईल. हा निर्णय मानवतावादी दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे.
तर अनुभवावर आधारित वेतन प्रणालीअंतर्गत वेतन दिले जाईल. ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी २८ हजार रुपये, १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी २९ हजार रुपये आणि १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्यांसाठी ३० हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना वैद्यकीय विमा सुविधाही पुरवण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी दिली आहे.
1. कर्नाटक सरकारने किती प्राध्यापकांची भरती जाहीर केली आहे
एकूण 10,419 अतिथी प्राध्यापकांची भरती जाहीर करण्यात आली आहे
2. ही नियुक्ती किती कालावधीसाठी असेल
तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असेल
3. हा निर्णय का घेण्यात आला आहे
महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
4. या निर्णयाची माहिती कोणी दिली
उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम सी सुधाकर यांनी ही माहिती दिली
5. विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होईल
शिक्षकांची संख्या वाढल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.