Karnataka-Marathi Issue: मराठीद्वेष की टेक्निकल चूक? कर्नाटकातील परीक्षेच्या निकालात घडला संतापजनक प्रकार

Karnataka-Marathi Issue: सीमाभागातील मराठी माणसांची होत असलेली मुस्काटदाबी आणि मराठी भाषेला दिलं जाणारं दुय्यम स्थान यामुळं अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण झालेली आहे.
Karnataka School Issue_AI Generated Image
Karnataka School Issue_AI Generated Image
Published on
Updated on

Karnataka-Marathi Issue: भाषेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधला संघर्ष अधुनमधून उफाळून येत असतो. सीमाभागातील मराठी माणसांची होत असलेली मुस्काटदाबी आणि मराठी भाषेला दिलं जाणारं दुय्यम स्थान यामुळं अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच आता आणखी एक नवा वाद उफाळून आला आहे. सीमाभागातील एका शाळेमध्ये परीक्षेनंतर जाहीर केलेल्या निकालपत्रात मराठी विषयाचा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना गुण तर दिलेत मात्र हा विषयच निकालपत्रातून गायब करण्यात आला आहे.

Karnataka School Issue_AI Generated Image
New Expressway : महाराष्ट्राच्या नकाशावर येणार 3 नवीन 'द्रुतगती' महामार्ग; आता प्रवास होणार एकदम सुपरफास्ट!
karnataka marathi issue anti marathi bias or technical glitch outrageous incident uncovered in karnataka exam results aau85
karnataka marathi issue anti marathi bias or technical glitch outrageous incident uncovered in karnataka exam results aau85

नेमका प्रकार काय?

याप्रकारामुळं कर्नाटक सरकारने आता शिक्षण क्षेत्रातही मराठीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालपत्रातून 'मराठी' हा शब्दच गायब केला आहे. अशा प्रकारे निकालपत्रात इतर सर्व विषयांची नाव छापलेली असताना मराठी हे नावचं ठापण्यात आलेलं नाही. निकालपत्रात 'मराठी' हे विषयाचं नाव लिहिण्याऐवजी ती जागा रिक्त ठेवण्यात आली आहे, पण त्यापुढे फक्त गुण नमूद करण्यात आले आहेत, असा प्रकार घडल्याचं एक निकालपत्र सध्या समोर आलं आहे, या प्रकारामुळं सीमाभागातून संताप व्यक्त केला जात आहे.

Karnataka School Issue_AI Generated Image
Sanjay Gaikwad : शिवरायांचा नक्की कोणता वारसा पुढे नेत आहात? दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेनं शिवराळ संजय गायकवाडांना झाप झाप झापलं

महाराष्ट्र एकीकरण समितीचं सरकारला आवाहन

दरम्यान, हा प्रकार म्हणजे मराठी भाषेचे अस्तित्व नाकारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली आहे. कितीही प्रयत्न झाले तरी सीमा भागातील मराठी भाषा आणि मराठी माणूस अबाधित राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ही चळवळ पूर्णत्वाला नेल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्र सरकारने तातडीने दखल घेऊन केंद्र सरकारकडे तक्रार करावी आणि मराठी भाषेला पुसण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Karnataka School Issue_AI Generated Image
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची कोंडी! काँग्रेसच्या अटीमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली

तांत्रिक चूक की मराठीद्वेष?

या निकालामुळे दोन मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत:

  • तांत्रिक चूक (Technical Error): जर ही केवळ सॉफ्टवेअरमधील चूक असेल, तर ती फक्त मराठी विषयाच्या बाबतीतच कशी घडली? असा सवाल उमेदवार विचारत आहेत.

  • मराठी द्वेष: अनेक संघटनांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला आहे. मराठी भाषेला दूर ठेवण्यासाठी हा 'संतापजनक प्रकार' घडल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com