DK Shivakumar Sarkarnama
देश

Congress vs JDS : सातव्या जागेवर रंगणार निवडणुकीचा थरार! काँग्रेसचा ‘मास्टरस्ट्रोक’ की जेडीएसचा गेमप्लॅन?

Karnataka MLC Election 2026 : Congress and JDS Face Off High-Stakes Battle Crucial Seventh Legislative Council Seat : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपले निकटवर्तीय विनय कार्तिक यांना उमेदवारी दिल्यानंतर या जागेभोवतीचे राजकीय गणित अधिकच तापले आहे.

Pradeep Pendhare

Karnataka Legislative Council Election 2026 : कर्नाटकमधील विधान परिषद निवडणुकीच्या सातव्या जागेमुळे आता राज्याच्या राजकारण ढवळून निघणार आहे. ही सातवी जागा सर्वाधिक चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनली आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपले निकटवर्तीय विनय कार्तिक यांना उमेदवारी दिल्यानंतर या जागेभोवतीचे राजकीय गणित अधिकच तापले आहे. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानात सहा जागांचे चित्र जवळपास स्पष्ट असले, तरी सातव्या जागेसाठी काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार काँग्रेसला चार जागा आणि भाजपला (BJP) दोन जागा सहज मिळू शकतात. मात्र खरी लढाई सातव्या जागेसाठी होणार आहे. काँग्रेसकडे सध्या 134 आमदारांचे संख्याबळ आहे. चार उमेदवार निवडून आणल्यानंतर पक्षाकडे सुमारे 22 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. सातव्या जागेवर विजय मिळवण्यासाठी काँग्रेसला आणखी सहा मतांची आवश्यकता आहे.

यामुळे अपक्ष, लहान पक्षांचे आमदार आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या सदस्यांच्या मतांना अचानक मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने (Congress) या अतिरिक्त मतांसाठी पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सातव्या जागेवरील निवडणुकीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात जेडीएसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पक्षाने उमेदवार दिल्यास निवडणूक अटळ ठरेल. जेडीएसकडे 18 आमदार आहेत. भाजपच्या अतिरिक्त मतांचा पाठिंबा मिळाल्यास हा आकडा 24 पर्यंत जाऊ शकतो. मात्र विजयासाठी आवश्यक मतसंख्या गाठण्यासाठी अजून चार मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदार, लहान पक्षांचे प्रतिनिधी आणि भाजपमधून हकालपट्टी झालेल्या आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या मतांसाठी काँग्रेस आणि जेडीएस दोन्ही पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

बिनविरोध निवड की प्रतिष्ठेची लढाई?

राजकीय विश्लेषकांच्या मते, जेडीएसने उमेदवार न दिल्यास विनय कार्तिक यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र जेडीएसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास ही केवळ मतांच्या आकड्यांची लढाई राहणार नाही, तर ती राजकीय रणनीती, संपर्कशक्ती आणि पडद्यामागील हालचालींचीही मोठी परीक्षा ठरेल. विशेष म्हणजे, आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कर्नाटकच्या राजकारणात घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमधील पक्षांकडील संख्याबळ

काँग्रेस : 134, भाजप : 62, जेडीएस : 18, अपक्ष : 1, केआरपीपी : 1, एसकेपी : 1, भाजपमधून हकालपट्टी झालेले : 3, सभापती : 1, रिक्त जागा : 2 आहेत.

‘किंगमेकर’ मते कोणाकडे?

सातव्या जागेच्या लढतीत अपक्ष, लहान पक्षांचे आमदार आणि पक्षातून बाहेर पडलेले सदस्य हेच खरे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत पडद्यामागील बैठका, राजकीय संपर्क आणि मतांची जुळवाजुळव याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 18 जूनची निवडणूक केवळ एका जागेचा निकाल ठरवणार नाही, तर कर्नाटकमधील आगामी राजकीय समीकरणांचाही संकेत देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT