Election Commission of India Sarkarnama
देश

Karnataka Legislative Council Election : लोकसभेच्या रणधुमाळीतच कर्नाटकात वाजले विधानपरिषदेचे बिगुल

Election Commission of India : निवडणूक आयोगाकडून सोमवारी कर्नाटकातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार लोकसभेच्या निकालानंतर 13 जूनला मतदान होणार आहे.

Rajanand More

New Delhi News : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील विधानपरिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत कर्नाटकात विधान परिषदेचे (Karnataka Legislative Council Election) बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच 13 जूनला मतदान होणार आहे.

कर्नाटकात सध्या काँग्रेसचे (Congress) सरकार असून विधानपरिषदेवरही त्यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. येत्या 17 जूनला विधानपरिषदेचे 11 सदस्य निवृत्त होत आहेत. विधानसभा (Assembly) आमदारांमधून या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आयोगाने सोमवारी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. (Karnataka Election 2024)

आयोगाकडून (Election Commission) 27 मेला निवडणुकीचे नोटीफिकेशन प्रसिध्द केले जाणार आहे. त्यानंतर इच्छुकांना तीन जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर चार जूनला अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना सहा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज मागे घेण्याआधीच लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल लागणार आहे. (Latest Election News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानपरिषदेसाठी 13 जूनला मतदान होणार आहे. मतदान सकाळी 9 ते 4 या वेळेत होणार असून त्यानंतर तासाभरातच म्हणजे पाच वाजता मतमोजणीला सुरूवात हईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येईल. 15 जूनपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (Latest Election Marathi news)

दरम्यान, मागील महिन्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील (Maharashtra Election) विधान परिषदेच्या चार जागांसाठीही निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा समावेश होता. मात्र, उन्हाळी सुट्टीच्या काळात निवडणूक घेतल्यास त्याचा मतदानावर परिणाम होईल, अशा तक्रारी शिक्षक संघटनांकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT