AAP News : मोठी बातमी! केजरीवालांच्या 'आप'ला सौदी अरेबिया, कुवैतमधून अवैध फंडिंग, काय आहे 'ED'ने गृहमंत्रालयाला दिलेला रिपोर्ट?

Arvind Kejriwal : आपला मिळणारे फंडीग त्यातील अनियमीतता आणि त्या फंडाचा आपच्या आमदाराने व्यक्तीगत लाभासाठी केलेला वापर यावर देखील ईडीने बोट ठेवले आहे
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

AAP News : कथिक मद्य धोरण आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जमीनावर आहेत. मात्र, 'आप'ला अजुन एक मोठा धक्का बसला आहे. अरब देशातून अवैध फंडींग 'आप'ला झाल्याचा अहवाल ईडीने गृहमंत्रालयाला Home Ministry साजरा केला आहे.

Arvind Kejriwal
Maharashtra Politics : अमित शहांच्या मर्जीतील भाजप नेत्याचे मोठे भाकित; ‘विधानसभेला कदाचित वेगळं चित्र असूही शकतं’

आम आदमी पार्टीला AAP अमेरिका, कॅनडा, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कुवैत, ओमनसह इतर देशातून देणगी मिळाली होती. देणगी ट्रान्सफर करण्यासाठी देणगीदारांनी एकच पासपोर्ट, क्रेडीट कार्ड, ईमेलआयडी, मोबाईल नंबरचा वापर केल्याचे ईडीने ED सांगितले आहे.

आमदारवर ही आक्षेप

आपला मिळणारे फंडीग त्यातील अनियमीतता आणि त्या फंडाचा आपच्या आमदाराने व्यक्तीगत लाभासाठी केलेला वापर यावर देखील ईडीने बोट ठेवले आहे. 2016 मध्ये कॅनडातून फंड रेजिंगमध्ये जमवलेले पैसे आमदार दुर्गेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यक्तिगत लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

देणगीदारांची नावे लपवली

फंड रेजिंग कॅम्पेनमधून आपने पैसाच गोळा केला नाही तर परदेशी फंडासाठी एफसीआरए अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधापासून वाचण्यासाठी देणगीदारांची माहिती देखील लपवली असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Arvind Kejriwal
Income Tax Raid : दुकान चपलांचं, पण सोफा, बेड, पिशव्या भरून नोटांचे बंडल; IT अधिकाऱ्यांचे डोळे फिरले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com