Karnataka Corruption Case: ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता जमा केल्याचा संशय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक लोकायुक्तांनी मंगळवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत आठ सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थाने, कार्यालये तसेच काही नातेवाइकांच्या मालमत्तांची झडती घेण्यात आली.
लोकायुक्त पोलिस (Police) अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पहाटेपासून बंगळूर, बिदर, मंड्या, चिक्कबळ्ळापूर आणि कोडगू यांसह विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. झडतीदरम्यान रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, महागड्या वस्तू, विदेशी मद्य तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आढळल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या (Officer) मालमत्तेची कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची तपासणी लोकायुक्तांकडून केली जात आहे. छाप्यांमध्ये सापडलेल्या मालमत्ता आणि इतर वस्तूंचे एकूण मूल्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बिदरमध्ये कृषी विभागाचे अधिकारी माणिक राव यांच्या मालमत्तांवर लोकायुक्तांनी कारवाई केली. बिदर शहरातील हळ्ळी कॉलनी येथील निवासस्थान, हुमनाबादमधील घर आणि चित्तगुप्पा तालुक्यातील मुथंगी गावाजवळील फार्महाउसची झडती घेण्यात आली. लोकायुक्त उपअधीक्षक हनुमंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. झडतीदरम्यान मिळालेली कागदपत्रे आणि इतर मालमत्तेची तपासणी करण्यात येत आहे.
जेस्कॉमच्या सहायक कार्यकारी अभियंता राजेश्वरी यांच्या गुलबर्ग्यातील महालक्ष्मी लेआउट येथील निवासस्थान, खादरी चौकातील दुसरे घर आणि कार्यालयावर लोकायुक्त पथकाने एकाच वेळी छापा टाकला. राजेश्वरी सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेल्या असताना लोकायुक्तांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले. त्या घरी परतण्यापूर्वीच झडती सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
दर्शन गौडा (प्रथम श्रेणी सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय, चिक्कबळ्ळापूर)
रंगनाथ एच. एम. (निवृत्त कार्यकारी अभियंता, बीबीएमपी, बंगळूर)
श्रीदेवी (जिल्हा नोंदणी अधिकारी, बंगळूर)
एच. आर. रमेश (मुख्याधिकारी, नगरपालिका, मडिकेरी)
किरण कुमार बैंदूर (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम, हुबळी-धारवाड)
राजेश्वरी (सहायक कार्यकारी अभियंता, जेस्कॉम, गुलबर्गा)
माणिक राव (सहायक संचालक, कृषी विभाग, बिदर)
शिवराजू (वसतिगृह अधीक्षक, मागासवर्गीय कल्याण विभाग, मंड्या)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.