

Sujay Vikhe Patil statement on Nila Vikhe Patil : विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात या निवडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेले मिश्किल वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
नीला विखे पाटील यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ग्रीन पार्टीच्या उमेदवार म्हणून विजय मिळवला. स्वीडनच्या अधिकृत संसदीय संकेतस्थळावरही त्यांची ग्रीन पार्टीच्या खासदार (MP) म्हणून नोंद असून त्यांचा मतदारसंघ ‘City of Stockholm’ असा नमूद करण्यात आला आहे. त्यांचा संसदीय कार्यकाळ 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असल्याची अधिकृत नोंद आहे.
नीला विखे पाटील या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे (Balasaheb Vikhe)पाटील यांच्या नात आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पुतणी आहेत. त्यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. स्वीडनच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून तसेच स्टॉकहोम सिटी कौन्सिलमध्येही काम केले आहे.
नीला यांच्या स्वीडनमधील राजकीय यशाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “आपल्याला खासदारकीपासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. भारतात खासदार नाही झालो तर आपण स्वीडनमध्ये होतो. खासदारकी सोडायची नाही. ही बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आहे.
महाराष्ट्र एक झाला आणि आमच्या नावापुढील खासदार काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठूनही खासदार होऊ,” असे सुजय विखे पाटील यांनी म्हटल्याचे व्हायरल व्हीडिओ मध्येदिसते. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नीला विखे पाटील यांच्या विजयाची आणि विखे कुटुंबाच्या राजकीय प्रवासाची चर्चा करताना सुजय विखे यांच्या या मिश्किल टिप्पणीची भर पडली आहे. अहिल्यानगरशी जोडलेली व्यक्ती स्वीडनच्या राष्ट्रीय संसदेत पोहोचल्याने विखे पाटील कुटुंबाच्या राजकीय प्रवासाची चर्चा आता होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.