Karnataka Maharashtra Dispute
Karnataka Maharashtra Dispute  Sarkarnama
देश

Karnataka Maharashtra Dispute : सीमाप्रश्न अमित शाहांच्या कोर्टात : तोडगा निघणार?

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Maharashtra Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीच्या भेटीवर आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha)यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्ये, राज्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याची व्यक्त केलेली इच्छा, या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावरून दोन्ही राज्यात तणाव वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला बैठकीसाठी रवाना होत आहेत. अमित शाह यांच्याकडे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आमने सामने असतील, यावेळी सीमाप्रश्नी चर्चा होणार आहे. याबैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील खासदारांनी सुद्धा अमित शाहांची भेट घेतली होती. केंद्राने यात मध्यस्थी करावी अशी मागणी करण्यात आली होती. याच अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्याच्या या बैठकीत काय निर्णय घेतला जातो. यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .यासोबतच महाराष्ट्राची भूमिका शिंदे - फडणवीस कशा पद्धतीने मांडतता, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT