Crime News  Sarkarnama
देश

Crime News : भयंकर..! राज्य सरकारच्या योजनेचा व्यवसायावर परिणाम? कपडा व्यापाऱ्याने पत्नी आणि मुलाचा खून करत संपवले स्वतःचे जीवनही

Karnataka Shocking Crime News : कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय कपडा व्यापाऱ्याने जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्यात व्यापाऱ्याने राज्य सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेला जबाबदार धरले आहे.

Aslam Shanedivan

Karnataka Crime News : एका ६५ वर्षीय कपडा व्यापाऱ्याने आपल्या पत्नीची आणि मुलाचा खून करून स्वतः जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातील असून व्यापाऱ्याने लिहिलेली चिठ्ठीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यापाऱ्याने जीवन संपवण्यापूर्वी आपल्या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेला (शक्ती योजना) जबाबदार धरले आहे. यानंतर आता कर्नाटकात खळबळ उडाली असून पोलिस तपास करताना दिसत आहेत. प्रभाकर असे ६५ वर्षीय कपडा व्यापाऱ्याचे नाव असून ज्योती (पत्नी-५५)) आणि संतोष (२८) असे मृतकांचे नाव आहे.

'पीटीआय'च्या वृत्तानुसार, ६५ वर्षीय प्रभाकर हे कपडा व्यापारी असून भाड्याच्या घरात राहत होते. पण वाढते कर्ज, कर्जफेडीचा दबाव आणि व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे ते चिंतेत होते. तर याच वर्षी २६ एप्रिल रोजी मुलगा संतोषचे लग्न मेघना हिच्याशी झाले होते. दरम्यान सोमवारी रात्री सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते झोपायला गेले. मंगळवारी (ता.९) सकाळी प्रभाकर यांची सून मेघनाने घरातील सर्व कामे आणि पूजा उरकली. यानंतर सासू ज्योती यांना उठवण्यासाठी गेली असता खोलीत मृतदेह दिसला. तर प्रभाकर यांनी कपड्याच्या दुकानात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी तापास करताना प्रभाकर यांनी लिहलेली चिठ्ठी सापडली. ज्यात त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याचे म्हटले आहे. तसेच प्रभाकर यांच्यावर गृहकर्ज आणि व्यवसायातील तोट्याचे ताण असल्याचेही आता समोर आले आहे. तर या चिठ्ठीत त्यांनी व्यवसायात नुकसान झाल्याचे म्हणत या तोट्याला राज्य सरकारच्या मोफत बस योजना असल्याचे म्हटलं आहे. प्रभाकर यांनी या योजनेचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आणि उत्पन्न घटल्याचा, दावा केला आहे.

तसेच व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने गृहकर्जाचे हफ्ते आणि ईएमआय भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. तर खासगी सावकारांकडून होणारा छळ आणि चक्रवाढ व्याजाच्या वाढत्या बोजाचाही उल्लेख ही या चिठ्ठीत करण्यात आला आहे. यामुळे कुटुंब प्रचंड आर्थिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी स्वतः ज्योती व मुलाची हत्या केल्याचे चिठ्ठीत लिहल्याची माहिती मंड्याच्या पोलीस अधीक्षक (SP) शोभा राणी व्ही. जे. यांनी दिली आहे.

या चिठ्ठीवरून आता या धक्कादायक घटनेचे खरे कारण समोर आले असून प्रभाकर यांनी आधी पत्नी आणि नंतर मुलाचा गळा आवळून खून केला असावा आणि त्यानंतर स्वतः जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. तपासादरम्यान पत्नी आणि मुलाच्या गळ्यावर खुणा आढळल्या असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, खरे कारण समोर येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT