Shivsena Crime News : उद्धव ठाकरेंच्या नेत्यावर पोलीस स्टेशन परिसरातच महिलांकडून हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Shivsena Leader Attacked: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांची राज्यभरात धामधूम सुरू असतानाच मुंबईतून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर पोलिस स्टेशनच्या परिसरातच हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
Navi Mumbai crime
Navi Mumbai crimeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांची राज्यभरात धामधूम सुरू असतानाच मुंबईतून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर पोलिस स्टेशनच्या परिसरातच हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवी मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उप शहरप्रमुख महेश कोटीवाल यांच्यावर तुर्भे पोलिस स्टेशनच्या परिसरातच हल्ला झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा हल्ला काही महिलांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. ही हल्ल्याची घटना गुरुवारी (ता.4 जून) दुपारी नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. महिलांकडून करण्यात येत असलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचंही समोर येत आहे.

हल्ला झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप शहरप्रमुख महेश कोटीवाल हे तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र, तक्रार दिल्यानंतर ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

Navi Mumbai crime
Shivsena Crises : कोल्हापूरच्या शिवसेना आमदाराच्या मुलाचा कॅसिनोत जुगार खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल; उद्धव ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षाकडून राजीनाम्याची मागणी

महेश कोटीवाल यांच्यावर महिलांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर कोटीवाल हे आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित महिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पहिलं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्यांनी मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडल्याचीही माहिती समोर आली होती. याबाबतची माहिती साम वृत्तवाहिनीने दिली आहे.

शिवसेना नेते महेश कोटीवाल यांच्यावर महिलांकडून हल्ला करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत 'महेश कोटीवाल यांच्यासोबत काही कार्यकर्ते असल्याचं दिसून येत आहे. ते पोलीस स्टेशनच्या परिसरात उभे असताना त्यांचा दोन महिलांसोबत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या शाब्दिक बाचाबाचीनंतर संबंधित महिलांनी कोटीवाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.

Navi Mumbai crime
Vidhan Parishad Election : दोन्ही शिवसेनेच्या ‘वाघां’ची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार; सोपल, माेहिते पाटलांची मनधरणी यशस्वी होणार का?

महेश कोटीवाल यांना महिलांकडून मारहाण सुरू असताना काहीजणांनी हा प्रकार सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ही मारहाण सुरूच होती. अखेर एका पोलीस कर्मचाऱ्यानं हा प्रकार थांबवला. या प्रकरणी महेश कोटीवाल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपचा पदाधिकारी अडचणीत...

मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी युसूफ रंगवाला याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगवाला हा कुलाबा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 224 चा भाजपचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली होती. त्याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai crime
Pune MLC Election : दिलीप वळसे पाटील-शरद पवार भेटीनंतर सूत्र फिरली, पुण्याच्या मैदानातून महाविकास आघाडीची माघार

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेला भाजप पदाधिकारी व आरोपी युसूफ रंगवाला याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फोन केला होता. यावेळी आरोपीकडून फोनवरुनच महिलेला मी एका तासासाठी तुमच्या घरी येऊ का?" अशी विचारणा करण्यात आली. महिलेनं त्याची या मागणीला तीव्र विरोध करत त्यास स्पष्ट नकार दिला.

महिलेकडून स्पष्ट नकार मिळाल्यानंतरही आरोपी थांबला नाही. यानंतर आरोपी युसूफ रंगवाला यानं महिलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. धक्कादायक बाब म्हणजे व्हि़डीओ कॉल केला त्यावेळी आरोपी नग्नावस्थेत होता. तसेच या व्हिडीओ कॉलमध्ये त्यानं महिलेसमोरच अश्लील हावभाव व चाळे केल्याचा खळबळजनक दावा पीडित महिलेनं केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com