Karnataka Politics : कर्नाटक सरकारमधील कॅबिनेट मंत्री एस. एस. मल्लिकार्जून यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. भाजपच्या आमदारांविषयी त्यांनी वापरलेली असंसदीय आणि मानहानीकारक भाषेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
हरिहर भागातील काही शेतकरी मंत्री मल्लिकार्जून यांच्याकडे विविध मागण्या घेऊन गेले होते. मल्लिकार्जून हे फलोत्पादन तसेच दावनगेरे जिल्हाचे प्रभारी मंत्रीही आहेत. भद्रा धरणातील पाणी आपल्या भागाला मिळाले, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांनी मंत्र्यांशी संवाद साधताना त्यांना आधी आपण भाजप आमदार बी.पी. हरीश यांच्याकडे गेल्याचे सांगितले.
आमदार हरीश यांनी आपल्याला मंत्र्यांकडे जा, असे सांगतिल्याची माहिती शेतकऱ्यांनी मंत्र्यांना दिली. शेतकऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले की, पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांनाही पाणी मिळेना. हरीश अण्णा यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मंत्र्यांना विचारा असे उत्तर दिले.
शेतकऱ्यांची ही तक्रार ऐकून मंत्री मल्लिकार्जून चांगलेच संतापले. त्यांनी भाजप आमदाराविषयी वादग्रस्त विधान केले. व्हायरल व्हिडिओमध्ये ते आमदारांविषयी बोलताना शेतकऱ्यांना वादग्रस्त सल्ला देताना दिसतात. हरीश यांना अण्णा (मोठा भाऊ) म्हणू नका. त्यांना स्लीपरने मारा, असे मंत्री म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
मंत्र्यांच्या या विधानानंतर भाजप आमदार हरीश यांनी पलटवार केला आहे. मंत्र्यांच्या या वागण्याला मतदारच उत्तर देतील. शेतकऱ्यांशी चांगल्यापध्दतीने वागण्याऐवजी त्यांनी माझ्याविषयी असंसदीय भाषा वापरली. आता जनताच त्यांचा निकाला लावतील, असा आमदार म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.