Karnataka CM Oath Ceremony
Karnataka CM Oath Ceremony  Sarkarnama
देश

Karnataka CM Oath Ceremony: सिद्धरामय्यांच्या शपथविधीला ममता बॅनर्जी मारणार दांडी; विरोधकांची एकता कशी साधणार?

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Politics: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत. येत्या २० मे रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. बॅनर्जींच्या जागी तृणमूलचे नेते काकोली घोष दस्तीदार (Kakoli Ghosh Dastigir) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ममता बॅनर्जी यांना 20 मे रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे यांनी निमंत्रित केले होते. शपथविधीला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दाखवत, विरोधकांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न ही यातून दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

तृणमूल नेते आणि राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते. पक्षाच्या नेत्या ममता बँनर्जी यांनी शुभेच्छा दिल्या आणि तृणमूलच्या लोकसभेतील उपनेत्या कोकिला घोष दस्तीदार यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

ममता बॅनर्जी यांनी नुकतेच सांगितले होते की, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष काँग्रेसला मजबूत स्थितीत असलेल्या ठिकाणी पाठिंबा देईल." सिद्धरामय्या यांच्या शपथविधी समारंभातील त्यांची उपस्थिती विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी महत्त्वाची मानली जात होती." ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, "जिथे काँग्रेस मजबूत आहे, तिथे काँग्रेसला लढू द्या. आम्ही त्याला पाठिंबा देऊ, पण काँग्रेसला इतर राजकीय पक्षांनाही पाठिंबा द्यावा लागेल."

कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचापराभव करून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर काही वेळातच ममता बॅनर्जी यांनी हे विधान केले होते. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या, तर भाजप आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (सेक्युलर) यांनी अनुक्रमे 66 आणि 19 जागा जिंकल्या.

दरम्यान, मागील चार पाच दिवसांपासून सत्तास्थापनेचा काँग्रेसचा (Congress) तिढा वाढतच होता. अखेर सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांना मुख्यमंत्री तर डि के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री पद असे सत्तास्थापनेचे सूत्र मान्य झाल्यानंतर, अखेर काँग्रेसपुढील तिढा सुटला. मात्र आता सत्तास्थापनेच्या तिढा सुटतो न सुटतो काँग्रेसमध्ये अजून एक नाट्याला सुरूवात झाली आहे.

उद्या २० मे रोजी सिद्धरमय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. शपथविधीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध विरोधीपक्षांना आणि नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रितांची यादीच काँग्रेसने जाहीर केली आहे. मात्र एक विशेष गोष्ट म्हणजे, या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेकांची नावे नाहीत. निमंत्रितांच्या यादीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याचे नावांचा समावेश आहे.

(Edited BY - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT