Subramanian Swamy on Mamata Banerjee : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. (subramanian swamy mamata should be prime minister genuine opposition)
त्यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले , "तृणमूल काँग्रेसच्या (TMC)अध्यक्षा ममता बॅनर्जी या पंतप्रधान व्हायला पाहिजे,"
"आज देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला घाबरला पाहिजे," असे ते म्हणाले. आपल्या वादग्रस्त विधानामुळे सुब्रमण्यम स्वामी हे चर्चेत असतात.
काही महिन्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पराभवाबाबत विधान केले होते. त्यांनी आँगस्ट २०२२मध्ये सुप्रीम कोर्टासमोर मोदी सरकारने केलेल्या दाव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत त्यांनी अनेक वेळा टीका केली आहे.
"आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान कोण होईल, हे मोदींना सांगितले पाहिजे," असा रोखठोक सवाल स्वामींनी विचारला आहे. ७५ वर्षांनंतरच्या व्यक्तींना तिकीट न देण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर त्यांनी जहरी टीका केली होती.
"बंगालमध्ये मोदी नाही तर ममता बॅनर्जी यांची जादू चालली. ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव करुन पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला स्पष्ट बहूमत मिळाले आहे," असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
"पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच धार्मिक असल्याचा दावा करतात.असा दावा करून मंदिरे पाडण्याचा काम करत आहेत किंवा त्यावर ताबा मिळवत आहेत. उत्तराखंड आणि वाराणसीमध्ये हेच झालं आहे. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळवून पंढरपूरच्या पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना बनवत आहे, असे स्वामी यांनी यापूर्वी म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी मोट बांधण्यास सुरवात केली आहे.विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. ते गुरुवारी (ता.११) मुंबई दौऱ्यावर आहेत.
नितीश कुमार हे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. ठाकरेंच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
या भेटीमध्ये ते ठाकरे आणि पवार यांना देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठीच्या विशेष बैठकीचे निमंत्रण देणार असल्याचे समजते. भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या भेटीत नेमकं ते काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.