Siddaramaiah
Siddaramaiah  Sarkarnama
देश

Karnataka Politics : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री फोन वापरतच नाहीत; सिद्धरामय्यांच्या काही ठळक गोष्टी..

सरकारनामा ब्यूरो

Karnataka CM Oath Ceremony : चार दिवसांच्या घमासान चर्चेनंतर काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरील अखेर वाद मिटवला.सिद्धरामय्याच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे स्पष्ट झाले. डि के शिवकुमार यांना काही महत्त्वाच्या खात्यांसह उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शिवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. सरकारचा शपथविधी 20 मे रोजी शपथ होईल. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

मोबाईल फोन वापरत नाही :

सिद्धरामय्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेख खास गोष्टी आहेत. ते असे नेते आहेत की, जे कधीच मोबाईल फोन वापरत नाहीत. ते पीए च्या साहाय्याने काही मोजक्या महत्त्वाच्या लोकांशी फोनवर बोलतात. ते आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी गरीब लोक हा घटक असतो .

जनता दलात काम :

सिद्धरामय्या यांनी सुमारे अडीच दशके 'जनता परिवारा'शी सूत जुळवत काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले सिद्धरामय्या 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते 2005 पर्यंत काँग्रेसचे कट्टर विरोधक होते, परंतु माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे जनता दलातून बाहेर पडल्यानंतर ते काही काळ जेडीएस सोबत राहिले.

शांतता, खंबीरपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ते ओळखले जातात. सिद्धरामय्या यांनी 2013 मध्ये जेव्हा त्यांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री बनवले तेव्हा राज्याची सूत्रे हाती घेऊन, त्यांनी त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली.

शेवटची निवडणूक ?

या त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष गोष्टींमुळे नऊ वेळा आमदार राहिलेल्या सिद्धरामय्या यांना पाच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर आणले आहे. राज्यात दुसऱ्यांदा पक्षाच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. सिद्धरामय्या यांनीआधीच जाहीर केले होते की, ही त्यांची शेवटची निवडणूक असेल.

पहिली मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली?

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या दिग्गजांना बाजूला सारण्याचे श्रेयही सिद्धरामय्या यांना जाते. या वेळी त्यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, तर २०१३ मध्ये त्यांनी एम. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर मात करत मुख्यमंत्री पद मिळवले होते. 2004 मध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्थेनंतर, काँग्रेस आणि जेडी(एस) यांनी आघाडी सरकार स्थापन केले. त्यावेळी जेडीएसमध्ये असलेले सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, तर काँग्रेसचे एन. धरमसिंह मुख्यमंत्री झाले. सिद्धरामय्या यांची तक्रार होती की त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण देवेगौडा यांनी त्यांची संधी नाकारली.

सिद्धरामय्या जेडीएस मधून बाहेर पडले :

सिद्धरामय्या हे कुरुबा समाजाचे आहेत, जे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. सिद्धरामय्या यांनी स्वत:ला मागासवर्गीयांचे नेते म्हणून प्रस्थापित केले आहे. योगायोगाने देवेगौडा यांचा मुलगा एच.डी. पक्षातील एक उदयोन्मुख नेते म्हणून पुढे येत होते.

सिद्धरामय्या यांना जेडीएसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेश प्रमुख म्हणून काम पाहिले होते. देवेगौडा हे कुमारस्वामी यांना पक्षाचे नेते म्हणून पुढे आणत असल्याने, सिद्धरामय्या यांना हटवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

वकील असलेले सिद्धरामय्या यांनी त्यावेळीही 'राजकारणातून निवृत्ती' घेऊन वकिली पेशात परतण्याचा विचार व्यक्त केला होता. निधी जमवता येणार नसल्याचे कारण सांगत त्यांनी स्वत:चा पक्ष काढण्याची शक्यता फेटाळून लावली होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांना पक्षात पदाची ऑफर दिली होती, मात्र भाजपच्या विचारसरणीशी ते सहमत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 2006 मध्ये त्यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT