Udayanraje Bhosle : उदयनराजेंनी पालिका प्रशासनास फटकारले; म्हणाले, "अशुद्ध पाणीपुरवठा..."

Satara City : कामात हलगर्जी करणाऱ्या कर्माचाऱ्यांनी बदली करून घेण्याचा इशारा
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Udayanraje Bhosle News : स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. शहराच्या पश्चिम भागाला अशुद्ध, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर ते अत्यंत क्लेशदायी आहे. संबधित कर्मचाऱ्यांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा बदली करून घ्यावी. नागरिकांच्या भावनांशी व जीवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

Udayanraje Bhosale
J P Nadda In Pune : जे पी नड्डांची बापटांच्या घरी भेट; आठवणींना उजाळा...

सातारा शहरात (Satara) होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत खासदार उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे की, "शहराच्या पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून रामाचा गोट, मंगळवार पेठ भागात दूषित पाणीपुरवठा होत होता. त्याबाबत सातारा विकास आघाडीने प्रशासनाला सूचनाही केल्या होत्या. पण, प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून बसले होते. अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही."

शुद्ध पाण्याऐवजी डेडस्टॉकमधील पाणी सोडण्यात आल्याची माहितीही उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, "स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क आहे. कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. धरणापासून नवीन अतिरिक्त पाईपलाईनही मंजूर करण्यात आली आहे. पश्चिम भागातील पाणीपुरवठ्या बाबत माहिती घेतली असता फिल्टर केलेले पाण्याऐवजी डेड स्टॉकमधील पाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी सोडल्याने निदर्शनास आले. असे असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा."

Udayanraje Bhosale
D. K. Shivakumar: ...म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसनं रद्द केला तीन उपमुख्यमंत्री पदाचा 'फॉर्म्यूला'

कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बदली करून घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे म्हणाले की, "पाणीपुरवठ्याच्या वितरण पद्धतीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सुधारणा करावी. ज्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी. शहराच्या पश्चिम भागातील अपुरा व शुद्ध पाणीपुरवठा तत्काळ थांबवा. शुद्ध आणि अधिक दाबाने पाणी द्या."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com