कर्नाटक प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली.
धारवाड खंडपीठाने सविस्तर सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
या निर्णयामुळे संघटनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील प्रक्रिया नियमांनुसार होणार आहे.
Teachers Election Dispute News : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या निवडणुकीसंदर्भातील वादावर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणुकीवरील स्थगिती आदेश उठविण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने सविस्तर सुनावणीनंतर फेटाळून लावली आहे. त्यामुळे संघटनेच्या सध्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, संघटनेचा कार्यकाळ डिसेंबरमध्येच संपुष्टात आला असल्याने आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सहकार खात्याच्या निबंधकांमार्फतच राबविणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे आतापर्यंत सुरू असलेले अंतर्गत वाद आणि सत्तासंघर्षाला तात्पुरता विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले होते, पण निवडणूक वेळापत्रकानुसार मतदारयादी, उमेदवारी अर्ज उपलब्ध झाले नसल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे बेळगाव शहर व तालुका तसेच खानापूर व कित्तूर तालुक्यातील शिक्षकांनी यासंदर्भात थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शिवाय या निवडणुकीच्या विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेलाच स्थगिती दिली होती. शिवाय या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी सर्व शिक्षकांना उपलब्ध करून दिली जावी, असा आदेशही बजावला होता.
निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यासाठी शिक्षक संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी (ता. २४) सुनावणी झाली. या सुनावणीत स्थगिती उठविण्यास न्यायालयाने नकार दिला. शिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सहकार खात्याच्या निबंधकांच्या माध्यमातून राबविण्याचा महत्वाचा आदेशही बजावला.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणार
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. काही ठिकाणी निवडणूक न घेता थेट नियुक्त्या करण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. याच मुद्द्यांवरून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. आता न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्याने सहकार खात्याचे निबंधक संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
1. हायकोर्टाने कोणता निर्णय दिला?
शिक्षक संघटनेच्या निवडणुकीवरील स्थगिती हटवण्याची याचिका फेटाळली.
2. हा निर्णय कोणत्या खंडपीठाने दिला?
धारवाड खंडपीठाने हा निर्णय दिला.
3. या निर्णयाचा संघटनेवर काय परिणाम होईल?
सध्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
4. पुढील प्रक्रिया काय असेल?
न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांप्रमाणे प्रक्रिया पार पडेल.
5. हा वाद कशामुळे निर्माण झाला?
शिक्षक संघटनेच्या निवडणुकीसंदर्भातील मतभेद आणि कायदेशीर मुद्द्यांमुळे वाद निर्माण झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.