kash patel becomes fbi director gets approval from senate  Sarkarnama
देश

Kash Patel FBI India Connection : अमेरिकन गुप्तचर संस्था 'FBI'च्या प्रमुखपदाची जबाबदारी मिळालेले काश पटेल यांचे 'INDIA' कनेक्शन!

Kash Patel India Link : जाणून घ्या, जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे घेतले अन् या आधी कोणती जबाबदारी होती त्यांच्याकडे?

Mayur Ratnaparkhe

FBI Chief and India : अमेरिकेची गुप्तचर आणि कायदा अंमलबजावणी संस्था एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले भारतीय-अमेरिकन काश पटेल यांचे पूर्वज गुजरातचे होते. त्यांच्या समुदायाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नवीन एफबीआय प्रमुखांचे मूळ गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील भद्रन गावातील आहे.

जिथून त्यांचे कुटुंब जवळपास 70 ते 80 वर्षांपूर्वीच सर्वात आधी युगांडा येथे स्थलांतरीत झाले होते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले काश पटेल पाटीदार समुदायातून येतात. आता ते अमेरिकेची प्रमुख कायदा अंमलबजावणी संस्थेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय- अमेरिकन बनले आहेत.

पाटीदार समूदायाच्या नेत्यांनी म्हटले की, पटेल यांचे सर्वज नातेवाईक परदेशात स्थायीक झाले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्या नातेवाईकांनी अफ्रिकेस गेल्यानंतर भद्रनमधील आपले वडिलोपार्जित घर विकले. आणंद स्थित समूदायाची 'छ गाम पाटीदार मंडल' संघटना आपल्या सदस्यांची वंशावळ ठेवते. संघटनेचे सचिव आणि भाजपचे(BJP) आणंद जिल्हा अध्यक्ष राजेश पटेल यांनी म्हटले की, वंशावळीत काश पटेल यांचे वडील प्रमोद पटेल आणि त्यांचे भाऊ व आजोबांची नावंही आहेत. काश पटेल यांचे नाव वंशावळीत जोडले जाणे अद्याप बाकी आहे.

राजेश पटेल यांनी सांगितले की, कॅनडातून ते अमेरिकेस गेले, जिथे 1980 मध्ये काश पटेल यांचा जन्म झाला. काश पटेल यांनी याआधी कार्यवाहक संरक्षणमंत्री क्रिस्टोफर मिलर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले होते. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण रिचमंड विद्यापीठातून पूर्ण केले आणि मग न्यूयॉर्कला परत येवून कायद्याची पदवी मिळवली.

तर, अमेरिकेचे नवीन एफबीआईचे संचालक काश पटेल यांना आणखी मोठी जबाबदारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अल्कोहल, टॅाबैको, फायरआर्म्स अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्स (एटीएफ) च्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT