अमेरिकेचे नवीन एफबीआईचे संचालक काश पटेल यांना आणखी मोठी जबाबदारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अल्कोहल, टॅाबैको, फायरआर्म्स अॅण्ड एक्सप्लोसिव्स (एटीएफ) च्या प्रमुखपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागीय अधिकाराने ही माहिती दिली आहे. पुढील आठवड्यात. काश पटेल यांना एफबीआई आणि एटीएफच्या प्रमुखपदाची शपथ देण्यात येणार आहे.
एफबीआई: एफबीआय हे अमेरिकेतील मोठी तपास संस्था आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेसंबधीत विषयावर काम करणारी संस्था आहे.
एटीएफ: बंदूक, विस्फोटक शस्त्रे, त्याबाबतची खटले यांची चौकशी करणारी ही संस्था आहे. बंदूक विक्रींचा परवाना आणि त्याबाबत प्रकरणे याबाबत ही संस्था काम पाहते. या दोन्ही प्रमुख संस्थेची जबाबदारी डोनाल्ड ट्र्रॅम्प यांनी काश पटेल यांच्याकडे सोपवली आहे.
एफबीआईच्या संचालकपदी काश पटेल यांना नुकतीच शपथ देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीवर डेमोक्रटिक पक्षाच्या खासदारांनी अनेक आरोप केले आहे. नाराजी व्यक्त केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी काश पटेल यांच्या नियुक्तीस विरोध केला आहे.
या पदासाठी काश पटेल अयोग्य असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असून ते ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर काम करतील, रिपब्लिकन नेत्यांचे विरोधक त्यांच्या निशाण्यावरील असतील, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांचे म्हणणं आहे
फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यावर काश पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. "एफबीआयच्या नवव्या संचालकपदी माझी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आणि अँटर्नी जनरल बॅाडीचे सदस्य यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी धन्यवाद," असे पटेल यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.