New Delhi : Sarkarnama
देश

Womens Reservation: मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीत उपोषण; काय आहे प्रकरण?

Kavitha to hold protest in Delhi: तेलंगण'चे मुख्यमंत्री के.सी आर यांच्या कन्या के. कविता दिल्लीतील जंतरमंतर मैदानात उपोषण करत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Telangana News: महिला आरक्षणासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांची मुलगी के. कविता यांचं आजपासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर उपोषण सुरू झालं आहे. देशातील १८ पक्षांनी या उपोषणाला पाठींबा दिला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजूरी मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. (KCR's daughter Kavitha to hold protest in Delhi)

कविता यांच्या या मागणीला आम आदमी पक्ष, अकाली दल, पीडीपी, तृणमुल कॉंग्रेस, JDU, NCP, CPI, RLD, NC यांच्यासह समाजवादी पक्षाने पाठींबा दिला आहे. त्यामुळं आगामी काळात केंद्र सरकारसाठी हे उपोषण डोकदुखी ठरण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे के सी आर यांची मुलगी के कविता यांचं दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात नाव आलं असून त्यांना ED ने नोटीस बजावली आहे. त्या दरम्यान महिला आरक्षणासाठी मोठं आंदोलन दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सुरू झालं आहे.

बीआरएस नेत्यांशिवाय, आप नेते संजय सिंह आणि चित्रा सरवरा, शिवसेनेचे शिष्टमंडळ, अकाली दलाचे नरेश गुजराल, पीडीपीचे अंजुम जावेद मिर्झा, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. शमी फिरदौस, टीएमसीच्या सुष्मिता देव, जेडीयूच्या केसी त्यागी, राष्ट्रवादीच्या डॉ सीमा मलिक, सीपीआयच्या नराणा मलिक, के. सीपीएमचे सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाच्या पूजा शुक्ला, राष्ट्रीय जनता दलाचे श्याम रजक, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांचाही सहभाग असल्याची माहिती आहे.

मात्र दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्याप्रमाणेच कविता यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. अनेक समन्स पाठवल्यानंतर ईडी 11 मार्च रोजी कविता यांची चौकशी करणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरुण पिल्लई आणि कविता यांची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते, अशीही माहिती आहे. कविताचा फ्रंट मॅन म्हणून काम करणाऱ्या अरुण पिल्लईला ईडीने दारू घोटाळ्यात अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT