Arvind Kejriwal - Uddhav Thackeray
Arvind Kejriwal - Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Arvind Kejriwal in Mumbai: केजरीवालांची महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना मागणी; राज्यसभेत 'तो' अध्यादेश मंजूर करु नका

सरकारनामा ब्यूरो

Arvind Kejariwal Criticized Modi Government : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला. पण केंद्र सरकारने आठ दिवसातच निर्णयाविरोधात एक अध्यादेश काढला आणि दिल्ली सरकारचे सर्व अधिकारच हिसकावून घेतले. सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय केंद्र सरकार मानत नसेल तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, देशात २०२४ ला शेवटच्या निवडणुका होतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल आणि मान यांच्यासोबत आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी मंजूर करु नये, अशी मागणी आज अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारण एकीकडे पण आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. आम्ही नाती संभाळणारी लोक आहोत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासोबत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या याचिकेवर निर्णय़ दिला. पण देशातून लोकशाही हटवू पाहणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. (Modi Government)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, २०१५ मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार आले तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने एक अध्यादेश काढून आमचे सर्व अधिकार हिसकावून घेतले. या निर्णयाविरोधात गेली आठ वर्षे आम्ही न्यायालयात लढत होतो. न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधातच वटहुकूम काढत दिल्ली सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. केंद्राने थेट न्यायालयाचे निर्णयच धुडकावून लावले.

भाजपने दिल्लीत अनेकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आमचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. एखाद्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी यांचे तीन प्रकार आहेत. पहिला आमदार विकत घेणे. दुसरा, तपास यंत्रणांचा दबाव टाकणे आणि तिसरा अध्यादेश काढून राज्याचे अधिकार हिसकावून घेणे.

देशातील केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही.यांच्या पक्षाचे लोक न्यायालयातील न्यायाधिशांनाही शिव्या देतात. अपशब्द वापरतात. असे अहंकारी, स्वार्थी, लोक देश चालवू शकत नाही. अशी टीकाही केजरीवाल यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT