Eknath Shinde News: ...तर मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यात साप सोडणार!''; 'या' संघटनेचा इशारा

Chhatrapati SambhajiNagar News : छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे आणि बुद्धांची भूमी...
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Chhatrapati SambhajiNagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या २६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी कन्नड शहरात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जाहीर सभा होणार आहे. सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक नेते या सभेची जोरदार तयारी करत आहेत. याचवेळी आता मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati SambhajiNagar)हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवावा अशी जोरदार मागणी केली जात आहे. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून आंदोलनं देखील करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता पँथर्स आर्मी संघटना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री शिदेंच्या दौऱ्यापूर्वी हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) ताफ्यात साप सोडण्याचा इशारा पॅंथर्स संघटनेनं दिला आहे.

Eknath Shinde News
Uddhav Thackeray- Eknath Shinde Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप होणार; ठाकरे-शिंदे..; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

पँथर्स आर्मीनं छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ अजिंठा लेणीकडे जाताना हर्सूल टी पॉईंट येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसविण्याबाबत पँथर्स आर्मीच्या वतीनं शासनाकडे मागणी करण्यात येत आहे. पण याची दखल घेतली जात नाही. मुख्यमंत्री तसेच राज्य सरकार(State Government)नं आमच्या या मागणीचा प्राधान्यानं विचार करून तातडीनं हर्सूल टी पॉईंट येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Eknath Shinde News
New Parliament : ...म्हणून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर 'बहिष्कारा'चं सावट; मोदी सरकारविरोधात १९ पक्ष एकवटले

...म्हणून शिंदेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा

राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे येत्या 26 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com