BJP MP Praveen Khandelwal writes a letter to Union Home Minister Amit Shah requesting the renaming of Delhi as Indraprastha 
देश

State name change : केरळपाठोपाठ आणखी एका राज्याचं नाव बदलणार? भाजप खासदाराची गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी

State name change proposal to Home Minister: केरळपाठोपाठ आता आणखी एका राज्याचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. भाजप खासदाराने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे याबाबत औपचारिक मागणी केली असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Rashmi Mane

केरळनंतर आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या राज्याच्या नावाबाबत चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच केरळ राज्याच्या नावात बदल करण्यास मंजुरी दिल्यानंतर, राजधानी दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबतचे अधिकृत पत्र अमित शाह यांना पाठवत ही मागणी केली आहे.

दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार खंडेलवाल यांनी दिल्लीचे नाव “इंद्रप्रस्थ” असे ठेवावे, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना पत्र पाठवले आहे. त्यांच्या मते, “इंद्रप्रस्थ” हे नाव भारताच्या प्राचीन इतिहासाशी जोडलेले असून, त्यामुळे राजधानीची ऐतिहासिक ओळख अधिक ठळक होईल.

खंडेलवाल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, भारताची संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. देशाच्या राजधानीचे नावही त्या परंपरेचे आणि वारशाचे प्रतीक असावे. 'दिल्ली' या सध्याच्या नावाऐवजी 'इंद्रप्रस्थ' हे नाव स्वीकारल्यास प्राचीन भारतीय इतिहासाशी असलेले नाते अधिक दृढ होईल, असे त्यांचे मत आहे.

इतिहासातील उल्लेखांनुसार, इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी मानली जाते. त्यामुळे दिल्लीतील पुराण किल्ला परिसरात पांडवांचे पुतळे उभारावेत, असा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. यामुळे पर्यटकांना आणि नागरिकांना राजधानीच्या प्राचीन वारशाची जाणीव होईल, असा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, नावबदलाची प्रक्रिया ही केवळ राज्यस्तरावर पूर्ण होत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार, कोणत्याही राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे असतो. राज्यघटनेतील अनुच्छेद ३ नुसार संसदेला राज्याच्या सीमांमध्ये बदल करण्याचा, क्षेत्रफळात फेरबदल करण्याचा किंवा नाव बदलण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, त्याआधी संबंधित राज्याच्या विधानसभेचा अभिप्राय मागवला जातो.

दिल्लीचे नाव “इंद्रप्रस्थ” करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे सरकण्यासाठी पहिल्यांदा तो दिल्ली विधानसभेत मांडला जाईल आणि तेथून केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर संसदेत मंजुरी मिळाल्यासच नावबदल अधिकृतपणे लागू होऊ शकतो. याआधीही दिल्लीचे नाव बदण्याची मागणी झालीआहे. त्यामुळे सध्या ही मागणी चर्चेच्या टप्प्यावर असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT