Sarada Muraleedharan Sarkarnama
देश

Kerala Chief Secretary : मुख्य सचिव ठरल्या वर्णभेदाच्या बळी; शारदा म्हणाल्या, 'आई तू मला परत तुझ्या गर्भात...'

Kerala Chief Secretary Sarada Muraleedharan disappointment racism : केरळ राज्य मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांना वर्णभेदाला समोरे जावे लागल्याने नाराजी व्यक्त केली.

Pradeep Pendhare

Kerala news 2025 : केरळच्या मुख्य सचिव मुरलीधरन शारदा वर्णभेदाच्या बळी ठरल्या. समाज माध्यमांवर त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

आजही आपल्या समाजात वर्णभेद आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुरलीधरन यांच्या आधी त्यांचे पती डॉ. व्ही. वेणू केरळचे (Kerala) मुख्य सचिव होते.

शारदा मुरलीधरन यांनी समाज माध्यमांवर (Social Media) लिहिलेल्या पोस्टमध्ये असे म्हणाले की, अलिकडेच कोणीतरी त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळाची तुलना केली. यात माझा कार्यकाळ जितका कृष्णवर्णीय आहे, तितकाच माझा पती गोरा होता, असे टिप्पणी केल्याकडे शारदा मुरलीधरन यांनी लक्ष वेधले.

या टिप्पणीमुळे शारदा मुरलीधरन चांगल्याच दुखावल्या गेल्या. यावर त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे, "वर्णभेदावर चर्चा झाली पाहिजे. एखाद्याला काळा, असे लेबल लावले जाते, जणू काळा असणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. पण काळा माणूस तो असतो जो काळी कृत्ये करतो. माझ्या मुलांनी समजावून सांगितले की, हा रंगही सुंदर आहे".

शारदा मुरलीधरन यांनी पुढे लिहिले आहे की, "काळा रंग हा विश्वाचे वैश्विक सत्य आहे. त्याची बदनामी का केली जात आहे? मी चार वर्षांची होते तेव्हा मला आठवतंय की, मी माझ्या आईला विचारलं होतं". आई तू मला परत तुझ्या गर्भात घेऊन माझा रंग उजळ करू शकतेस का? मला अधिक सुंदर बनवून पुन्हा एकदा मला जन्म देऊ शकतेस का? गोरा रंग आकर्षक असतो या खोट्या प्रचाराला मीही बळी पडले, असेही शारदा मुरलीधरन यांनी म्हटले आहे.

शारदा मुरलीधरन या 1990 च्या बॅचच्या IAS आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांचे पती डॉ. व्ही. वेणू यांच्याकडून पदभार स्वीकारल्यापासून त्या केरळच्या मुख्य सचिव आहेत.मुख्य सचिव होण्यापूर्वी मुरलधीरन यांनी केंद्र आणि राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. 2006 ते 2012 पर्यंत त्यांनी केरळ सरकारच्या कुडुम्बश्री मिशनचे नेतृत्व केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT