Disha Salian : दिशा सालियानची आत्महत्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे?, क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Malvani Police Closure Report On Disha Salian : दिशा सालियान मृत्यूप्रकरणात क्लोजर रिपोर्टमधून एक एक खुलासे आता समोर येत आहेत. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाचे नेचे आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत.
Disha Salian
Disha SalianSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिहं राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. या प्रकरणात रोज काही ना काही समोर येत असून ज्यामुळे खळबळ माजत आहे. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांनी तर त्यांची नार्को टेस्टची मागणी लावून धरली आहे. अशातच आता क्लोजर रिपोर्टमधून एक माहिती समोर आली असून दिशा सालियान आर्थिक अडचणीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे तिचा मृत्यू (आत्महत्या) आर्थिक अडचणीतून झाली का असा संशय व्यक्त केला जातोय.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा खळबळ उडवून दिले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिशा सालियनचा इमारतीवरून पडून मृत्यू नाही. तर तिची सामुहीक बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धव घेतली असून याचिका दाखल केली आहे. तर यामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरियो, सुरज पांचाली यांच्यासह इतरांना आरोपी करण्याची विनंती केलीय. यामुळे अधिवेशनात देखील वाद पाहायला मिळाला होता. पण आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून या प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता मालवणी पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत असून यात तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे असल्याचे म्हटंल आहे. दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. तर ते एका महिलेला पैसे देत असल्याचे क्लोजर रिपोर्टमधून समोर आले आहे.

Disha Salian
Disha Salian Case: दिशा सालियनच्या मृत्यूचे खरं कारण आलं समोर; बलात्कार नाहीच; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

तर सतीश सालियान सतत दिशाकडे पैशांची मागणी करत असत. यामुळे ती थकली होती. याबाबत तिने अनेकदा आपल्या मित्रांनाही माहिती दिल्याचेही क्लोजर रिपोर्टमधून म्हटले आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Disha Salian
Disha Salian case : ‘’खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि ...’’ ; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरे पिता-पुत्रास चॅलेंज!

या क्लोजर रिपोर्टवरून आता रिपोर्टवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली आहे. त्यांनी, आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात आता संबंध नसल्याचे समोर आले आहे. पण सतत त्यांचे नाव घेतलं जात आहे. या प्रकरणाचा राजकीय भांडवल केलं जात असून सूडाचे राजकारणं केलं जातयं असाही आरोप केला आहे. तर नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या गौप्यस्फोटावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून पुरावे असतील ते सादर करावेत, असे आव्हान दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com