Security personnel inspect the site after a bomb attack on a BJP worker’s house in Kannur during the Kerala election campaign. Sarkarnama
देश

BJP worker attack : ऐन Hindi निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं, थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावरच टाकला बॉम्ब

Kannur bomb blast incident : रविवारी (ता.०५) रात्री साडेआठ वाजता अज्ञात व्यक्तीने कन्नूरच्या काथिरूरमधील कोकांची भागातील भाजपचा कार्यकर्ता मजीशा पथायाकुन्नु याच्या घरावर बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकण्याआधी या व्यक्तीने मजीशा यांना त्यांच्या घराजवळ येत शिवीगाळ केली.

Jagdish Patil

BJP Worker Bomb Attack : केरळमधील विधानसभा निवडणुका अगदी तीन दिवसांवर आल्या आहेत. ९ एप्रिल रोजी केरळमधील १४० विधानसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि टीएमसी आणि काँग्रेसने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फेकल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.०५) रात्री साडेआठ वाजता अज्ञात व्यक्तीने केरळमधील कन्नूरच्या काथिरूरमधील कोकांची भागातील भाजपचा कार्यकर्ता मजीशा पथायाकुन्नु याच्या घरावर बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकण्याआधी या व्यक्तीने मजीशा यांना त्यांच्या घराजवळ येत शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याने थेट घरावर बॉम्ब फेकला.

या बॉम्ब स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. शिवाय या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या बॉम्ब हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून या स्फोटाचा तपास करत आहे.

मात्र, या घटनेमुळे आता केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा आधीच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, केरळामधील १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT