

Prajakt Tanpure news : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. अक्षय कर्डिले भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होत असतानाच, इकडं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीत असलेले प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली.
चव्हाण आणि विखे पाटील यांनी तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करू नये, यासाठी तनपुरे यांची मनधरणी केली.
या तिघांबरोबर तनपुरेंचे बंधू हर्षल तनपुरे देखील, चर्चे सुरू असलेल्या बंद केबिनमध्ये उपस्थित होते. या चौघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणता प्रस्ताव ठेवला याचा अजून तपशील समोर आलेला नाही. मात्र या चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
याच चर्चेवेळी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंचं मुख्यमंत्री फडणवीस (Prajakt Tanpure) यांच्याशी फोनवर बोलणं करून दिल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी मंत्री विखे पाटील यांनी तनपुरेंबरोबर त्यांच्याच कार्यालयात नाश्ता केला.
रवींद्र चव्हाण, विखे पाटील आणि तनपुरेंबरोबर नाश्ता करतानाच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद करून दिल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर तनपुरेंचा नेमका काय संवाद झाला, मुख्यमंत्र्यांनी तनपुरेंसमोर काय प्रस्ताव ठेवला याचा तपशील मात्र समोर आला नाही.
गेल्या वीस वर्षात राहुरी तालुक्याला अल्प असं विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालं आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राहुरी तालुक्यातील जनता ऐकायला तयार नाही. पण निवडणूक लढवायची की नाही, हे सर्वसामान्य राहुरीतील जनतेशी, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.
अक्षय कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहुरीत दाखल झाले होते. त्याचवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दाखल झाले. तनपुरे अपक्ष अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, विखे पाटलांनी थेट तनपुरेंना फोन करत, आम्ही भेटण्यासाठी येत आहोत, असे सांगितलं. याला तनपुरेंनी देखील माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला.यानंतर चव्हाण अन् विखे पाटील तनपुरेंच्या कार्यालयात दाखल झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.