Congress Leader Shashi Tharoor Sarkarnama
देश

Shashi Tharoor : केरळ निकालानंतर शशी थरूरांच्या वक्तव्याची देशभर चर्चा, 'केरळ स्टोरी' म्हणत केलं ट्विट; 'जातीयवाद्यांनी नोंद घ्यावी...'

Shashi Tharoor on Kerala Election : देशात नुकताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल लागला असून भाजपला तीन राज्यात मोठे यश मिळाले आहे. तर काँग्रेसने केरळ विधानसभा निवडणुकीत १०२ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे.

Aslam Shanedivan

  • केरळ विधानसभा निवडणुकीत UDF ला मोठा विजय मिळाला.

  • शशी थरूर यांनी केरळला सामाजिक सलोख्याचा आदर्श म्हटले.

  • जात आणि धर्मापेक्षा माणुसकीला प्राधान्य दिल्याचे थरूरांचे मत.

Kerala Election News : नुकताच केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने मोठं यश मिळवलं आहे. काँग्रेसने येथे दणदणीत विजय मिळवत आता सत्ता स्थापनेकडे पावले टाकली आहेत. यादरम्यान काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. त्यांनी यात 'केरळ स्टोरी' म्हणत केरळला जातीय सलोख्याचा आदर्श म्हटले आहे. सध्या त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. येथे काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) ने १०२ जागा जिंकल्या आहेत. तर १४० सदस्यीय असणाऱ्या केरळ विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक आहेत. येथे काँग्रेस पक्षाने ६३, सीपीआय (एम) ने २६, इंडियन युनियन मुस्लिम लीगने २२, सीपीआयने ८ आणि केरळ काँग्रेसने सात जागा जिंकल्या. तर पहिल्यांदाच भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. UDF च्या आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

यानंतर आता येथे सत्ता स्थापनेसाठी खळबतं केली जात असून मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन, रमेश चेन्निथला आणि के. सी. वेणुगोपाल यांची नावे शर्यतीत आहेत. तर यूडीएफ आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगने (IUML) मुख्यमंत्रिपदासाठी थेट विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केल्याचे दिसत आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारी राहिलेले रमेश चेन्नीथला यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असून पिनराई विजयन यांच्या पहिल्या कार्यकाळात चेन्नीथला यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती.

अशातच आता शशी थरूर यांनी यांनी राज्याला जातीय सलोख्याचा आदर्श म्हणत ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये, देशात ओळख आणि धर्मावर आधारित राजकारणाचा प्रभाव वाढत आहे, अशावेळी केरळ हे असे ठिकाण आहे जिथे लोक जात आणि धर्मापेक्षा माणुसकीला प्राधान्य देतात.

याचे उदाहरण देताना त्यांनी, तीन मतदारसंघांचा उल्लेख आहे. त्यांनी, ख्रिश्चन उमेदवार व्ही. एस. जॉय हे मुस्लिमबहुल थवनूर मधून निवडून आले आहेत. तर हिंदूबहुल कलामासेरी येथून मुस्लिम उमेदवार व्ही. ई. अब्दुल गफूर जिंकले आहेत. तर ख्रिश्चनबहुल कोची मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार मोहम्मद शिया यांचा विजय झाला आहे.

हे निकालच जातीय सलोख्याचे उदाहरण असून केरळमधील मतदार धर्म आणि ओळखीपेक्षा उमेदवारांना प्राधान्य देतात. देशभरात निवडणुकांदरम्यान धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण हा सतत चर्चेचा विषय असताना 'माणूस प्रथम, धर्म नंतर' असाच मार्ग नेहमीच केरळने अवलंबला असल्याचेही थरूर यांनी म्हटले आहे.

FAQs :

1. शशी थरूर यांनी काय वक्तव्य केले
केरळ हे सामाजिक सलोख्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले

2. कोणत्या आघाडीला केरळमध्ये विजय मिळाला
काँग्रेस नेतृत्वाखालील UDF ला विजय मिळाला

3. थरूर यांनी कोणत्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली
त्यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले

4. थरूर यांनी केरळबद्दल काय विशेष सांगितले
लोक जात धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व देतात असे ते म्हणाले

5. या वक्तव्याची चर्चा का होत आहे
देशातील ओळख आणि धर्माधारित राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT