Kerala Corruption Case : भ्रष्टाचार आणि हवाला मार्गाने परदेशात पैसा पाठविल्याच्या आरोपांवरून केरळ दक्षता विभागाने माजी मुख्यमंत्री तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीणा विजयन आणि जावई मोहम्मद रियास यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
केरळ (Kerala) उच्च न्यायालयाच्या शुक्रवारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला विजयन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
पिनाराई विजयन यांच्या मुलीची एक्सलॉजिक सोल्युशन्स ही आयटी कंपनी आणि कोचीस्थित कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड यांच्यातील आर्थिक व्यवहार केंद्रस्थानी आहेत. सीपीएमचे सरकार (CPM Government) सत्तेत असताना सीएमआरएलने वीणा यांच्या कंपनीला कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने पैसे दिल्याचा आरोप आहे.
सीएमआरएलने कोणतीही प्रत्यक्ष सेवा न घेता आयटी सल्लागार शुल्काच्या नावाखाली एक्सलॉजिक सोल्युशन्सला 2.78 कोटी रुपये दिले. या कथित व्यवहाराला प्राप्तिकर विभागाच्या तपासातून समोर आला आहे. हे व्यवहार पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात झाल्याचा दावा ईडीने केला आहे.
पहिल्या गुन्ह्यात पिनराई विजयन यांना मुख्य आरोपी, तर त्यांची मुलगी वीणा यांना दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी करण्यात आले आहे. दुसऱ्या गुन्ह्यात माजी पर्यटनमंत्री आणि विजयन यांचे जावई मोहम्मद रियास यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. विजयन यांच्यावतीने वीणा यांना 3.8 कोटी रुपये मिळाल्याचा, तर रियास यांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचाराचा पैसा म्हणून 100 कोटी रुपये परदेशात पाठविल्याचा आरोप आहे.
सरकारी भागीदारी असलेल्या ‘कोची मिनरल्स अँड रुटाइल्स लिमिटेड’ या कंपनीने वीणा यांच्या कंपनीला सेवा शुल्काच्या नावाखाली पैसे दिल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही सेवा पुरविण्यात आली नव्हती. केरळच्या किनारपट्टीवरून वाळू उत्खननाच्या व्यवसायातून कंपनीला मोठा नफा मिळत असताना हे पैसे वळविण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.