Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसला मोठा धक्का? 25 आमदार भाजपच्या संपर्कात; विजयेंद्रांचा दावा

Karnataka BJP chief claims 25 Congress MLAs, including ministers, may switch sides : कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा दावा; मंत्रीही पक्षांतराच्या तयारीत असल्याचे वक्तव्य. विधानसभा निवडणुका उद्याच जाहीर झाल्या, तरी आमदार भाजपमध्ये येतील, असे त्यांनी म्हटले.
Karnataka Congress
Karnataka CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karnataka Congress BJP news : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरातली काँग्रेस एकवटत असतानाच, कर्नाटक राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस फुटीचा हादरला बसण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी काँग्रेसमधील 25 आमदार, मंत्र्यांसह भाजपच्या संपर्कात असून, प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असल्याचा दावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी करत खळबळ उडवून दिली. विजयेंद्र यांनी आपल्या दाव्याची पुष्टी करताना, विधानसभेच्या निवडणुका उद्याच जाहीर झाल्या, तरी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये येण्याची परिस्थिती आहे, असेही स्पष्ट केले.

मल्लेश्वरम इथल्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेसच्या डी. के. शिवकुमार (D K Shivakumar) सरकारवर जोरदार टीका केली. मंत्र्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पक्षाला प्रयत्न करण्याची गरज नाही. काँग्रेस सरकारने विकासाकडे दुर्लक्ष केले असून, फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. उत्तर कर्नाटकाबाबतही सरकारला पुरेशी आस्था नाही, असा आरोपही त्यांनी केला. डी. के. शिवकुमार यांच्यावरील विश्वास कमी झाला असून, सत्ताधारी पक्षात मुख्यमंत्र्यांवरील विश्वास संपल्याचे चित्र आहे.

राज्यात सुरू असलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या चर्चेवर भाष्य करताना भाजपचे (BJP) विजयेंद्र यांनी त्याची तुलना राजकीय व्यभिचाराशी केली. कोण स्टिंग ऑपरेशन करत आहे, कोण कोणाच्या विरोधात कट रचत आहे आणि त्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत, हे लवकरच उघड होईल, असेही बी. वाय विजयेंद्र यांनी म्हटले.

Karnataka Congress
BJP Congress controversy : आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजप-काँग्रेसला एकाच वेळी घेरले; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना सरकार स्टिंग ऑपरेशनच्या चर्चेत गुंतून आपल्या जबाबदारीपासून दूर पळ काढत असल्याचा आरोप विजयेंद्र यांनी केला. दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली अडीच हजार रुपयांची मदत भिकाऱ्यांना दिलेल्या मदतीसारखी असल्याची अवमानकारक टिप्पणी त्यांनी केली. शिवाय, जाहीर केलेली मदत अद्याप वितरित झालेली नसल्याचा दावाही विजयेंद्र यांनी केला.

Karnataka Congress
Parner Congress : पारनेर काँग्रेसमध्ये नाराजीचा उद्रेक; तालुकाध्यक्ष निवडीवरून सामूहिक राजीनामे

नवी दिल्लीत काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सरन्यायाधीशांची भेट घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न हा केवळ नाटक होते, असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com