Kiren Rijiju Sarkarnama
देश

Kiren Rijiju news : पंतप्रधानांना खोटारडे म्हणणे ब्रिटनच्या महिला खासदाराला पडलं महागात; किरेन रिजिजू यांच्याकडून 'तो' व्हिडिओ पोस्ट

Parliament Row India, British Parliament Model : ब्रिटनच्या संसदेतून अशाप्रकारे खासदाराला बाहेर काढण्याची मागील चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे.

Rajanand More

PM Dignity Debate : विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सरेंडर, चौकीदार ही चोर अशा शब्दांचा भडिमार केला जातो. भाजपकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. अनेकदा संसदेच्या दोन्ही सभागृहातही नेत्यांमध्ये यावरून जोरदार खडाजंगी होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांना खोटारडे म्हणणाऱ्या महिला खासदाराला संसदेतून बाहेर काढल्याचा व्हिडिओ रविवारी पोस्ट केला आहे.

रिजिजू यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ ब्रिटनमधील आहे. त्यामाध्यमातून त्यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे. पाकिस्तानी वंशाच्या खासदार जारा सुलताना यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांवर टीका करताना त्यांना खोटारडे म्हटले होते. संसदेत बोलतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर अध्यक्षांना जारा यांना थांबवत थेट निलंबित केले आणि सभागृहातून बाहेर काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

जारा सुलताना यांच्या विधानावर अध्यक्ष संतापल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. या व्हिडिओचा संदर्भ देत रिजिजू यांनी भारतातही असे ब्रिटिश-वेस्टमिंस्टर संसदीय लोकशाही मॉडेल आणायला हवे. भारतात तर पंतप्रधानांना डरपोक, सरेंडर, दहशतवादी, चोर आणि नको ते बोलले जाते. त्यानंतरही कुणावरही कारवाई होत नाही, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

इंग्रजांनी तर आपल्या पंतप्रधानांना केवळ खोटारडे म्हटले म्हणून पाकिस्तानी वंशाच्या जारा सुलताना यांना संसदेतून बाहेर काढले, असे म्हणत रिजिजू यांनी एकप्रकारे विरोधकांना सूचक इशाराच दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेतून अशाप्रकारे खासदाराला बाहेर काढण्याची मागील चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे.

जारा यांनी पंतप्रधान कीर स्टारमर यांना खोटारडे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांनी देशातील जनतेला फसविले, अशी टीकाही जारा यांनी केला. अध्यक्षांनी त्यांचे भाषण थांबवत त्यांना असंसदीय शब्दांचा वापर करून नये आणि शब्द मागे घ्यावेत, अशी ताकीद दिली. पण जारा यांनी शब्द मागे न घेतल्याने त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT