मुंबई : "दिवाळीनंतर फटाके फोडणार. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे व जावायचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पदार्फाश करणार" असा इशारा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. सोमय्या यांनी त्यावेळी या मंत्र्यांची नावे जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण किरीट सोमय्या हे ८ आणि ९ तारखेला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारमधील "एक मंत्री" यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहे. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन.
किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.