मुंबई : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांसह जावयाचे सहा घोटाळा उघड करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत.
आता दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे व जावायचे तीन असे एकूण सहा घोटाळ्यांचा पदार्फाश करणार असल्याचे सोमय्या यांनी रविवारी ट्विटरवरून जाहीर केलं. दिवाळीनंतर फटाके फोडणार असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढवले आहे. सोमय्या यांनी या मंत्र्यांची नावे जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर गवळी यांच्या पाच संस्थांवर आज ईडीनं EDकारवाई केली. त्यानंतर सोमय्या यांनी 'ठाकरे सरकारची महान इलेव्हन' अशा शब्दांत ११ जणांची यादी जाहीर केली आहे. सोमय्या यांची शिवसेनेवर आरोप करीत टि्वट केलं होतं. ''ठाकरे सरकारची महान इलेव्हन'' असं लिहीत त्यांनी ११ जणांची नावं जाहीर केली आहेत. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिली आहेत.
शिवसेना नेते अनिल परब आणि भावना गवळी यांच्या संदर्भात सध्या EDची कारवाई सुरू आहे. अनिल परब यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते, तर दुसरीकडे भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर EDची छापेमारी सुरुवात अशातच महाविकास आघाडीतील नेत्यांना या संदर्भात आता उत्तर द्यावेच लागतील, असे किरीट सोमय्या म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.