मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत झाली आहे. देशमुख यांना काल सत्र न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर ईडीच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयाने ईडीच्या बाजूने निर्णय देत देशमुखांना धक्का दिला आहे. यावरच प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची सुटका कधी होणार याबद्दल सांगितले आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत केली आहे. पण जो पर्यंत अनिल देशमुख हे सचिन वाझे कडून दर महिन्याची १०० कोटींची वसूली ही यायची, त्याचा हिशोब कोणाकडे किती जायचे? मग ते शरद पवार असोत की उद्धव ठाकरे असोत की. या वसूलीच्या लाभार्थ्यांचा हिशोब देत नाहीत तो पर्यंत त्यांची सुटका होईल असे मला वाटत नाही असा अंदाजही त्यांनी वर्तवला
पुन्हा ईडी कोठडी :
२ नोव्हेंबरला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना याआधी ६ नोव्हेंबरतची ईडी (ED custody) कोठडी देण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी पूर्ववत राहावी यासाठी देशमुखांच्या वकिलांनी प्रयत्न केले. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत ईडीच्या बाजूने निर्णय दिला.
१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात ED कडून अनिल देशमुख यांना ५ वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र वैद्यकीय कारण, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं देत ते अनेक दिवस चौकशीला अनुपस्थित राहत होते. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी अचानक ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची ६ नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली होती
किरीट सोमय्या दिल्ली मोहिमेवर :
किरीट सोमय्या हे उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारमधील "एक मंत्री" यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहे. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.