अनिल देशमुखांपाठोपाठ मुलगा ऋषिकेशच्याही अडचणीत वाढ

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
Anil Deshmukh Son Hrishikesh Deshmukh
Anil Deshmukh Son Hrishikesh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पाठोपाठ त्यांच्या मुलाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. शेल कंपनी आणि मनी लॉड्रिंगच्या प्रकरणाशी संबंधीत ईडीला चौकशी करायची आहे. मात्र त्यांनी १५ दिवसांची मुदत मागून घेतली होती. या दरम्यान ऋषिकेश यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावनी झाली. यात न्यायालयाने ऋषिकेश यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. तसेच या प्ररकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबरला अटक करण्यात आल्यानंतर ६ नोव्हेंबर म्हणजे आजपर्यंतची ईडी (ED custody) कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आली आहे. ईडीने आज देशमुखांच्या ९ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने ईडीलाही पुढच्या ८ दिवसांमध्ये या प्रकरणातील चौकशी पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Anil Deshmukh Son Hrishikesh Deshmukh
कुख्यात ड्रग पेडलरकडूनही अनिल देशमुखांची वसूली? भेटीचे फोटो व्हायरल

१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात ED कडून अनिल देशमुख यांना ५ वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र वैद्यकीय कारण, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं देत ते चौकशीला अनुपस्थित राहत होते. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी अचानक ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची ६ नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना आता तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात ठेवण्यात येणार असल्याचे समजते आहे. या दरम्यान ते जामीनासाठीही प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com