Andhra Pradesh Kurnool Bus Fire : ऐन दिवाळीत आंध्र प्रदेशमधील कुर्नूलमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. एक बाईक व्होल्वो बसला येऊन धडकल्यामुळे बसने अचानक पेट घेतला आणि या आगीत जवळपास 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री घडली असून बस पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. तर ही बस हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती.
पोलिसांनी सांगितलं की, हैदराबादवरून बंगळुरूकडे निघालेल्या एका बसला बाईक धडकल्यामुळे बसने अचानक पेट घेतला. काही मिनिटांत बस जळून खाक झाली. बाईकच्या धडकेत बसची बसच्या इंधनाची टाकी फुटल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील या बस दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळील बस आगीची दुर्घटना ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. या घटनेतबाधित कुटुंबांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल.
तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी देखील या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची सरकारला विनंती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.