Prakash Ambedkar : दलित तरुणाला अमानुष मारहाण; डोळा फोडला, शरीरावर लघुशंका; प्रकाश आंबेडकर आक्रमक, ‘मकोका’ लावण्याची मागणी

Prakash Ambedkar MCOCA : दलित तरुणाला मारहाण झाल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत या प्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे.
Prakash Ambedkar spoke with the family of the assaulted Dalit youth over the phone.
Prakash Ambedkar spoke with the family of the assaulted Dalit youth over the phone.sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील काही गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित तरुणाचे हात-पाय मोडले असून, त्याचा एक डोळा निकामी झाला आहे.

आरोपींनी क्रूरतेची हद्द ओलांडत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले. या घृणास्पद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला. या प्रकरणात सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, तसेच लवकरच ते पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संजय वैरागर या तरुणाला गावातील आरएसएसच्या 15 ते 20 गुंडांनी गावातून उचलून नेले आणि अज्ञात स्थळी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायावरून आणि हातांवरून मोटारसायकल घालून त्याचे हात-पाय मोडले. गंभीर मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झाला.

Prakash Ambedkar spoke with the family of the assaulted Dalit youth over the phone.
Priyanka Jarkiholi: कर्नाटकातील काँग्रेसचे तरूण महिला नेतृत्व; पहिल्या आदिवासी महिला खासदार

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला फेकून दिले. पीडित तरुण संजय वैरागर याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ॲड. आंबेडकर यांनी आज पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे.

वंचितचे शिष्टमंडळ पीडिताला भेटले

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या सोबत असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास यावेळी देण्यात आला. यावेळी पीडित कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर संवाद साधला.

Prakash Ambedkar spoke with the family of the assaulted Dalit youth over the phone.
Ravindra Dhangekar: एकनाथ शिंदेंकडून धंगेकरांना 'अभय'? उदय सामंत यांनी नाईकांकडे बोट दाखवलं;म्हणाले, कारवाई करायचीच असेल तर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com