“Ladakh activist Sonam Wangchuk arrested under the National Security Act following statehood protests.” Sarkarnama
देश

Sonam Wangchuk Arrest : लडाखमध्ये मोठी घडामोड : तरूणाईने 2 दिवसांपूर्वी भाजपचं कार्यालय पेटवलं; आज सोनम वांगचुक यांना अटक

Sonam Wangchuk Arrested Under National Security Act : राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत लेह पोलिसांनी वांगचुक यांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. सोनम वांगचुक अटकेत : लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश या मागण्यांसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली.

  2. हिंसाचाराचा आरोप : वांगचुक यांच्या भडकाऊ भाषणांमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी भाजप कार्यालयासह सरकारी कार्यालये व वाहने पेटवली. या घटनेत 4 आंदोलकांचा मृत्यू आणि 70 जखमी झाले.

  3. सरकारची कठोर कारवाई : गृहमंत्रालयाने वांगचुक यांना जबाबदार धरले, त्यांच्या संस्थेची मान्यता रद्द केली आणि आता त्यांच्या कैदेबाबत पुढील निर्णय घेतला जात आहे.

Ladakh Statehood Protests Turn Violent : मागील दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये तरूणाईचा भडका उडाला होता. लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तरुणांनी भाजपचे कार्यालय पेटवून दिले होते. या हिंसाचारात 4 आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी लडाखमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत लेह पोलिसांनी वांगचुक यांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरण्यात आले आहे. वांगचुक यांच्या भडकाऊ भाषणांमुळे प्रेरित होऊन तरूणांनी आंदोलन केल्याचा आरोप केंद्र गृह मंत्रालयाने केला होता.

वांगचुक यांनी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करावा आदी मागण्यांसाठी 10 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. जवळपास १५ दिवस हे आंदोलन शांततेत सुरू होते. पण बुधवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही तरूणांनी आंदोलनस्थळापासून लेह शहरात जात पोलिसांवर दगडफेक केली.

पोलिसांनीही अश्रधुरांच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी लेहमधील भाजपचे कार्यालय, तसेच एक सरकारी कार्यालय आणि सुरक्षा दलाच्य काही वाहनांना आग लावली. या हिंसाचारात चौघा आंदोलकांचा मृत्यू झाला असून जवळपास ७० जण जखमी झाले होते. या हिंसाचारानंतर वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच वांगचुक यांच्या भाषणांमुळे आंदोलन हिंसक बनल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गुरूवारी वांगचुक यांच्या संस्थेची मान्यताही रद्द करण्यात आली होती. तर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वांगचुक यांना जेलमध्ये ठेवायचे अन्य ठिकाणी याबाबत पोलिसांकडून चाचपणी केली जात आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: सोनम वांगचुक का आंदोलन करत होते?
A: लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश या मागण्यांसाठी ते उपोषण करत होते.

Q2: हिंसाचारात किती लोकांचा मृत्यू झाला?
A: या हिंसाचारात ४ आंदोलकांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जखमी झाले.

Q3: वांगचुक यांना कोणत्या कायद्यान्वये अटक झाली?
A: त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) अटक करण्यात आली आहे.

Q4: सरकारने त्यांच्या संस्थेबाबत काय निर्णय घेतला?
A: गुरुवारी त्यांच्या संस्थेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT