Lal Krishna Advani Sarkarnama
देश

Ram Temple Consecration : लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील सोहळ्यास जाणार नाहीत; काय आहे कारण ?

Sunil Balasaheb Dhumal

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण देशभर उत्सव सुरू आहे. सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र एकेकाळी राम मंदिरासाठी रथ यात्रा काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याची माहिती आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सध्या या भव्य मंदिराचा एक भाग तयार आहे. या मंदिरात सोमवारी म्हणजे आज रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेले 96 वर्षीय अडवाणी (Lal Krishna Advani) या सोहळ्यासाठी हजेरी लावणार होते. मात्र सध्या आयोध्येतील थंडी वाढल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत हे मंदिर होणार असल्याचे नियतीनेच ठरवल्याचे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी एका मासिकात लिहिलेल्या लेखात अडवाणींनी राम मंदिराबाबत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. अडवाणींनी राम मंदिर (Ram Temple) आंदोलनासाठी रथयात्रा काढली होती. याची आठवण करून देताना ते म्हणाले, 'रथयात्रेला जवळपास 33 वर्षे उलटून गेली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रा सुरू केली होती. त्यावेळी आम्हाला माहित नव्हते की ही यात्रा परमेश्वराच्या श्रद्धेने सुरू होईल. राम हे देशात एका चळवळीचे रूप घेईल.'

अडवाणींनी पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) कौतुक करताना म्हटले की, अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल, हे नियतीने ठरवले होते. आता नरेंद्र मोदी मंदिरात जेव्हा रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करतील, तेव्हा ते प्रत्येक भारतीयाचे प्रतिनिधीत्व करतील. मला आशा आहे की हे मंदिर सर्व भारतीयांना श्री रामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल. आता या मंदिराचे लोकार्पण होत असताना या ऐतिहासिक क्षणाला अटल बिहारी वाजपेयींना मिस करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांनी अयोध्येत श्री रामलल्ला मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 30 ऑक्टोबर 1990 ही तारीखही घोषित केली होती. याच संकल्पाने अडवाणींनी 25 सप्टेंबर 1990 ते 30 ऑक्टोबरदरम्यान सोमनाथ ते अयोध्या अशी 10 हजार किलोमीटरची रथयात्रा 10 राज्यांतून केली. या रथयात्रेने देशातील हिंदुत्वाची दडपलेली श्रद्धा जागृत केली होती. आता याला 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकाने पूर्ण होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT