Tamil Nadu News : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे कट्टर भाजपविरोधी आहेत. काँग्रेससोबत आघाडी करत त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. त्यांच्या पक्षाचे नेते सतत भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडत असतात. पण स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
तमिळनाडूत (Tamil Nadu) खेलो इंडिया (Khelo India) कार्यक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी घडलेल्या प्रकाराचा हा व्हिडिओ आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री स्टॅलिन, मंत्री उदयनिधी हे एकत्रितपणे व्यासपीठाच्या दिशेने चालले होते. यावेळी पंतप्रधान मोदी स्टॅलिन (MK Stalin) यांच्या हाताला धरून गप्पा मारत पुढे जात होते.
व्यासपीठाकडे जात असताना अचानक स्टॅलिन यांचा पाय घसरला आणि तोल गेला. शेजारीच असलेल्या मोदींनी लगेच दोन्ही हाताने त्यांचा हात धरत आधार दिला. त्यानंतर ते व्यासपीठाकडे गेले. मोदींनी स्टॅलिन यांना दिलेल्या आधाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकार 2036 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे. भारताला जागतिक खेळाचे हब बनवायचे आहे. मागील दहा वर्षांत भाजप सरकारने यूपीए सरकारच्या काळातील खेळांमधील भ्रष्टाचार न अनियमितता संपवली आहे.‘ तमिळनाडूनला भारताची खेळाची राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्टॅलिन यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.