Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav  Sarkarnama
देश

Land For Job Scam : लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; 'लँड फॉर जॉब' प्रकरणाचा खटला चालवण्यास परवानगी

सरकारनामा ब्यूरो

Lalu Prasad Yadav : रेल्वेतील 'लँड फॉर जॉब' घोटाळा प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारने सीबीआयला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लालू प्रसाद यादव हे देशाचे रेल्वेमंत्री असताना जमिनीच्या बदल्यात नोकरी असा आरोप झाला होता. त्या प्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवींसह इतर १४ जणांविरुद्ध कथित 'लँड फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची मुलगी मिसा भारती व रेल्वेच्या एका माजी महाव्यवस्थापकाचे नावे आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणांनी २३ सप्टेंबर २०२१ ला या घोटाळ्याशी संबंधित प्राथमिक चौकशी करत १८ मे ला एफआयआर दाखल केला होता.

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, 'लँड फॉर जॉब' घोटाळा प्रकरणामध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये ग्रुप डी पदांवर पर्यायी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या बदल्यात उमेदवारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन हस्तांतरित केली होती.

हे हस्तांतरण राबडी देवी, मीसा भारती, हेमा यादव यांच्या नावावर झाल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. पाटणामध्ये जवळपास १.५ लाख स्क्वेअर फूट जमीन लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबानी रोख रक्कम देऊन संपादित केल्याचं सीबीआयचं म्हणण आहे.

दरम्यान, आता याबाबतचा खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) सीबीआयला (CBI) परवानगी दिली आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT