Lalu Prasad Yadav and Narendra Modi 
देश

मोदीजी, 15 लाख रुपये अन् 2 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 15 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनापेक्षा (Aviation Turbine Fuel) पेट्रोल 33 टक्क्यांनी महागले असून, यावरून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे.

लालूप्रसाद यादव यांनी आज देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर मोदींवर हल्लाबोल केला. मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण लालूंनी करुन दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील प्रत्येकाला 15 लाख रुपये, 2 कोटी नोकऱ्या, दुप्पट उत्पन्न आणि अच्छे दिन या आभासी प्रवासात तुमच्या कारमध्ये फिरताना त्याला हवाई सफर समजा. महागाईच्या ओझ्याखाली दबून तुम्ही कळा सोसत राहा.

मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी 'बहुत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार', असा नारा मोदींनी दिला होता. त्यावेळी जनतेनेही याला मोठा प्रतिसाद दिला होता. मोदींनी पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. उलट तर ते ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 दिवस वाढ करण्यात आली आहे.

देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT