Lalu Prasad Yadav News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रमुख लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने आईआरसीटीसी घोटाळा आणि लँड फॉर जॉब प्रकरणात या तिघांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार, या घोटाळ्याचं प्लॅनिंग लालू यादवांच्या माहितीत करण्यात आलं होतं आणि त्यांच्या कुटुंबालाही याचा फायदा झाला आहे.
कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले की, माजी रेल्वे मंत्री म्हणून आपल्या पदाचा दुरुपयोग करून लालू यादवांनी काही खास लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी टेंडरमध्ये फेरफार केले. न्यायालयाने सांगितले की सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचार लालूंच्या माहितीत घडले. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव याचाही सहभाग होता. यांच्यासह एकूण 16 जण आरोपी आहेत.
आईआरसीटीसी प्रकरणात रांची आणि पुरीतील बीएनआर हॉटेलच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार आणि धोखाधडीसह विविध धारा लागू केल्या आहेत. लालू-तेजस्वी यांच्यासह इतर आरोपींवर भारतीय दंडसंहिता 120बी, 420 तसेच भ्रष्टाचार निवारण अधिनियम, 1988 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले गेले आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात देखील आरोपींना व्यक्तिगत उपस्थित राहण्यास कोर्टाने सांगितले असून, या प्रकरणातील निकाल 25 ऑगस्टला जाहीर होणार आहे.
IRCTC घोटाळा हा ‘लँड फॉर जॉब’ घोटाळ्यापेक्षा वेगळा प्रकरण आहे. या प्रकरणात आरोप आहे की, 2004 ते 2009 या काळात भारताचे रेल मंत्री असताना लालू यादवांनी IRCTC द्वारे दोन हॉटेल्सच्या देखभालीसाठी जारी केलेल्या टेंडरमध्ये हस्तक्षेप केला. टेंडरमध्ये छेडछाड करून सुबोध कुमार सिन्हा यांच्या कंपनी ‘सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड’ ला देखभाल आणि संचालनाचा करार मिळवून दिला गेला, असा आरोप आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या प्रकरणाचा राजकीय तापमानावर मोठा परिणाम होऊ शकतो. IRCTC घोटाळा प्रकरणाने लालू यादवांच्या इमेजला धक्का बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्ष या प्रकरणाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.