
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. MPSC कडून नवी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा राज्यातील हजारो उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. योग्य तयारी करणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची (MPSC Group C Combined Pre Exam 2025) नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे एकूण 938 पदांची भरती होणार असून परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
या भरतीत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक अशा विविध पदांचा समावेश आहे. त्यापैकी उद्योग निरीक्षक पदाच्या 9, तांत्रिक सहायक पदाच्या 4, कर सहायक पदाच्या 73, आणि लिपिक-टंकलेखक पदाच्या तब्बल 852 जागा आहेत.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता सुरू झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 ऑक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत असेल. अर्जाचे ऑनलाईन शुल्क देखील त्याच दिवशीपर्यंत स्वीकारले जाईल. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चलनाद्वारे शुल्क भरायचे असल्यास ते 29 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन घेता येईल आणि 30 ऑक्टोबरला कार्यालयीन वेळेत चलन भरता येईल.
उमेदवार भारतीय नागरिक असावा. उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी, तर इतर संवर्गांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समतुल्य पात्रता आवश्यक आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुण) आणि त्यानंतरची मुख्य परीक्षा (400 गुण). तसेच लिपिक-टंकलेखक आणि कर सहायक पदांसाठी उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देखील द्यावी लागेल.
खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये, तर माजी सैनिकांसाठी फक्त 44 रुपये शुल्क आहे. मुख्य परीक्षेसाठी हे शुल्क अनुक्रमे 544 रुपये, 344 रुपये आणि 44 रुपये असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.