Nitish Kumar
Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar : नितीश कुमार सरकारमधील कायदा मंत्रालय अडचणीत ; मंत्र्यांची अदलाबदल

सरकारनामा ब्यूरो

बिहार : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish kumar) यांनी आरजेडी नेते कार्तिकेय सिंग (kartikey singh) यांच्याकडून कायदा मंत्रालयाचा कार्यभार काढून घेतला आहे. कार्तिकेय सिंह हे अनंत सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. कार्तिकेय सिंह यांना एका जुन्या अपहरण प्रकरणात न्यायालयाकने वॉरंट जारी केले आहे. यामुळेच ते वादाच्या केंद्रस्थानी आले होते. या मुद्द्यावर मागील काही काळापासून भाजपने सातत्याने नितीश कुमार सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता नितीश कुमार यांनी सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेतल्यानंतर, त्याचे पडसाद उमटत आहेत (Latest Marathi News)

कार्तिकेय सिंह हे अनंत सिंह यांचे जवळचे मानले जातात. सिंह यांना एका जुन्या अपहरण प्रकरणात न्यायालयाकने वॉरंट जारी केले होते. यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. भाजपकडून या मुद्द्यावर नितीश कुमार सरकारला लक्ष्य केले जात होते. बिहारच्या मंत्रिमंडळातील वाद वाढल्यानंतर नितीशकुमार यांनी सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेतला आहे. मात्र सिंह यांच्याकडील कायदा मंत्रालय गेले असले तरी, ते यापुढेही मंत्री राहणार आहेत. आता त्यांच्याकडे ऊस उद्योग मंत्रालय देण्याची तजवीज करण्यात आली आहे. शमीम अहमद यांच्याकडे असलेले ऊस उद्योग मंत्रालय त्यांना देऊन, अहमद यांना कायदा मंत्रालय देण्यात आले आहे.

कार्तिकेय सिंह यांना 16 ऑगस्ट रोजी न्यायालयाने वॉरंट बजावले होते. न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. सिंह यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना वॉरंट जारी करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत त्यांनी आत्मसमर्पण केले नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT