भाजप विरोधी पक्षांच्या हालचाली ; मुख्यमंत्री केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट

K Chandrashekhar Rao : के. चंद्रशेखर राव यांनी भाजप मुक्त भारताची घोषणा केली आहे.
भाजप विरोधी पक्षांच्या हालचाली ; मुख्यमंत्री केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट
Published on
Updated on

बिहार : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बिगर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांमध्ये हालचाली दिसून येत आहेत. बिहारमध्ये वेगवेगळ्या सात राजकीय पक्षांनी भाजपची साथ सोडून बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. दरम्यान आज (३१ अॉगस्ट ) तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव नीतीश कुमारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत दुपारचे जेवण घेणार आहेत. राव हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव आणि तेजस्वी यादव यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजप विरोधी पक्षांच्या हालचाली ; मुख्यमंत्री केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट
बिहारपाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपला धक्का ; आमदार काढणार पाठिंबा

राव हे सातत्याने राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी पक्षांची एकजूट घडून यावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. आता नीतीश कुमार हे सुद्धा भाजपविरोधी मोट बांधण्यास सुरूवात करत आहेत. मात्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नीतीश यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करा, अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान ३ आणि ४ सप्टेंबरला बिहारच्या राजधानीत पटना येथे जनता दल युनायटेडची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतून जदयूची भूमिका अधिक स्पष्ट होईल.

भाजप विरोधी पक्षांच्या हालचाली ; मुख्यमंत्री केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट
आठवड्याभरात सिसोदियांना अटक होईल ; केजरीवालांचा दावा

गलवान घाटीमध्ये शहीद सैनिकांच्या कुटूंबियांना आर्थिक सहायता देण्यासाठी राव हे बिहार दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान बिहारमधील विविध नेत्यांशी ते गाठीभेटी घेणार आहे. राव हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. राव यांनी भाजप मुक्त भारताची घोषणा केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com