Uddhav Thackeray, Eknath Shinde, Election Commission News
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Election Commission News Sarkarnama
देश

Shivsena Symbol News : शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने काढले खोडून...सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Crisis : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी वेळी शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती.

कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला, असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाच्या कागद पत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या आवस्थेवर परिनाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांचा दावा. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर, असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांच्या बाजूने सुरु आहे.

असा युक्तीवाद सिब्बल करत आहेत. ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. शिवसेनेती फूट ही फक्त कल्पना आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिंदे गटाने बाजू मांडताना शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. परंतु त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता.

तसेच अँड मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते, असे म्हणाले होते. आज त्यावर सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT