Shivsena Symbol Row : शिंदे गटाला काहीच अर्थ नाही; सिब्बलांचा मोठा दावा

Shivsena Symbol News : शिवसेने संदर्भात महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात सुर आहे
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics Crisis News : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी वेळी शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती.

कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. असा युक्तीवाद सिब्बल करत आहेत. ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. शिवसेनेती फूट ही फक्त कल्पना आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Shivsena News : शिवसेनेची घटना कायद्याला धरूनच! सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील फूट आयोगाने ग्राह्य धरू नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिंदे गटाने बाजू मांडताना शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. परंतु त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Shivsena News : निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकलेला डाव ठाकरेगट उलटवणार; या मुद्यांवर घेरणार?

तसेच अँड मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते, असे म्हणाले होते. आज त्यावर सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court
MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026
Eknath Shinde
kapil sibbal